USA : इमर्जन्सी लॅंडिगदरम्यान विमानाची वाहनाला धडक; २ ठार | पुढारी

USA : इमर्जन्सी लॅंडिगदरम्यान विमानाची वाहनाला धडक; २ ठार

पुढारी ऑनलाईन डेस्क : नैऋत्य फ्लोरिडातील एका महामार्गावर आपत्कालीन लॅंडिगचा प्रयत्न करत असलेले विमान कारला धडकल्यानंतर झालेल्या स्फोटात दोन ठार झाले. ही घटना शुक्रवारी (दि.९) दुपारी घडली. घटनेनंतर परिसरात काळ्या धुराचे प्रचंड लोट हवेत पसरल्याने वाहतूक ठप्प झाली.

माहितीनुसार, अमेरिकेतील नैऋत्य फ्लोरिडामध्ये शुक्रवारी (दि.९)  कॉलियर काउंटीमधील पाइन रिज रोडजवळ इमर्जन्सी लँडिंग दरम्यान एक छोटे विमान कारला धडकले. हा महामार्ग फोर्ट लॉडरडेलकडे जातो. विमान कारला धडकल्यानंतर परिसरात  काळ्या धुराचे प्रचंड लोट हवेत पसरल्याने वाहतूक ठप्प झाली. विमानतळाचे प्रवक्ते रॉबिन किंग यांनी एका निवेदनात सांगितले की, “नेपल्स म्युनिसिपल विमानतळावर विमान उतरण्याच्या दोन मिनिटे आधी, वैमानिकाने एअर ट्रॅफिक कंट्रोलवर रेडिओ केला की “दोन्ही इंजिन निकामी झाले आणि त्याने आपत्कालीन लँडिंगची विनंती केली. पुढे बोलत असताना रॉबिन किंग म्हणाले की, “या अपघातात ३ जणांचे प्राण वाचवण्यात यश आले. कॉलियर काउंटी शेरीफ कार्यालयाने दोघांचा मृत्यू झाल्याची पुष्टी केली आहे.

Back to top button