’75 हार्ड’ फिटनेस चॅलेंज आले अंगलट..! महिला थेट हॉस्‍पिटलमध्‍ये | पुढारी

'75 हार्ड' फिटनेस चॅलेंज आले अंगलट..! महिला थेट हॉस्‍पिटलमध्‍ये

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : सोशल मीडियावर सध्‍या फिटनेस चॅलेंज ही एक क्रेझ झाली आहे. आपली शारीरिक क्षमता न तपासता केवळ फिटनेसच्‍या व्‍हायरल व्‍हिडिओने प्रभावित होवून अनेक जण अशी चॅलेंज स्‍वीकारतात. मात्र याचा गंभीर परिणाम होतो हे या पूर्वीही स्‍पष्‍ट झाले आहे. आता कॅनडात सध्‍या ’75 हार्ड’ फिटनेस चॅलेंजची ( ’75 hard’ fitness challenge ) प्रचंड क्रेझ आहे. मात्र हे चॅलेंज स्‍वीकारुन अति पाणी पिल्‍यामुळे एका महिलाला थेट हॉस्‍पिटलमध्‍ये ॲडमिट करण्‍याची वेळ आली, असे वृत्त ‘न्‍यूयॉर्क पोस्‍ट’ने दिले आहे.

काय आहे 75 hard’ fitness challenge ?

व्हायरल “75 हार्ड” सोशल मीडिया चॅलेंज आहे. या आव्‍हानामध्‍ये सलग ७५ दिवस दररोज एक गॅलन (अंदाजे चार लिटर) पाणी पिणे याचा समावेश आहे. सध्‍या या चॅलेंजमध्‍ये अनेकजण आपली शारीरिक क्षमता आणि आरोग्‍य याचा विचार न करता सहभागी होत आहे.

महिलेने शेअर केला TikTok वर आपला अनुभव

“75 हार्ड” सोशल मीडिया चॅलेंजमध्‍ये भाग घेतलेल्‍या कॅनडातील महिलेने आपला त्रासदायक अनुभव TikTok वर शेअर केला आहे. मिशेल फेरअबर्न असे त्‍यांचे नाव असून, त्‍या रिअर इस्‍टेट एजंटचे काम करतात. मिशेल यांनी संगितले की, मी व्हायरल “75 हार्ड” सोशल मीडिया चॅलेंजमध्‍ये भाग घेतला. १२ दिवस दररोज चार लिटर पाणी पिण्‍याचे कबुल केले. मात्र काही दिवसानंतर तिला शारीरिक त्रास होवू लागला. अधिक पाणी पिल्‍यामुळे तिला थेट रुग्‍णालयातच दाखल करावे लागले. तिच्‍या आरोग्‍यावर याचे गंभीर परिणाम झाले आहेत.
सोशल मीडिया चॅलेंजच्या स्‍वीकारलेल्‍या मिशेल फेअरबर्नला बाराव्या दिवशी आदल्या रात्री अस्वस्थता जाणवली. तिला मळमळ, प्रचंड अशक्तपणा जाणवला. तिने तत्‍काळ डॉक्टरांचा सल्ला घेतला.

अति पाणी पिल्‍याने शरीरात सोडियची कमतरता…

फॉलो-अप व्हिडिओमध्ये मिशेल यांनी म्‍हटलं आहे की, डॉक्टरांनी तिला सोडियमची गंभीर कमतरता असल्याचे निदान केले. ही अवस्‍था जीवघेणी स्थिती असू शकते. त्यामुळे तिला रुग्णालयात ॲडमिट हाेण्याचा सल्ला देण्यात आला. सोडियमची कमतरता, ज्याला हायपोनेट्रेमिया देखील म्हणतात. अधिक पाणी पिण्यामुळे शरीरातील सोडियमच्या पातळीत माेठ्या प्रमाणावर घट होते, असेही डॉक्‍टरांनी स्‍पष्‍ट केले.

मिशेलच्‍या शरीरातील सोडियम पातळी वाढवण्यासाठी डाॅक्‍टरांनी उपचार सुरु केले आहेत. तिला पाणी सेवन कमी करण्याची सूचना दिली आहे. दिवसभरात चार लिटरपेक्षा जास्त पाणी पिण्‍याऐवजी तिला दररोज अर्धा लिटर पाणी पिण्याचा सल्ला देण्यात आला आहे, असेही तिने स्‍पष्‍ट केले. जास्त प्रमाणात पाणी पिणे शरीराला अपायकारक ठरु शकते. यामुळे गंभीर आरोग्य समस्या उद्भवू शकतात, असेही डॉक्‍टरांनी स्‍पष्‍ट केले आहे.

हेही वाचा : 

 

Back to top button