Health : खुर्चीतच बसून झोपण्याचे ‘हे’ आहेत साईड इफेक्टस्! | पुढारी

Health : खुर्चीतच बसून झोपण्याचे ‘हे’ आहेत साईड इफेक्टस्!

नवी दिल्ली : Health : अनेकांना खुर्चीत बसल्या बसल्याच डुलकी लागत असते. काहींना काम करीत असताना, खुर्चीत बसून काही वाचत असताना झोपण्याची सवयही असते. मात्र, असे सतत करीत राहणे हानिकारक ठरू शकते. त्यामुळे अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होऊ शकतात असे तज्ज्ञांनी म्हटले आहे.

खुर्चीत बसून झोपल्याने पाठीच्या कण्याचा आकार खराब होऊ शकतो. यामुळे पाठदुखी किंवा पाठीला सूज येणे अशा समस्यांना सामोरे जावे लागू शकते. जास्त वेळ अशा स्थितीत झोपल्यामुळे रक्तवाहिनीमध्ये ब्लॉकेजची समस्या उद्भवते. तसेच मुंग्या येणे असा त्रासही होऊ शकतो. अशा परिस्थितीत दीर्घकाळ झोपण्याचे सर्वात मोठे नुकसान म्हणजे यामुळे पायांमध्ये रक्ताच्या गुठळ्या देखील होऊ शकतात, ज्यामुळे कालांतराने चालण्यास त्रास होऊ शकतो.

गरोदरपणात महिलांना झोपेशी संबंधित अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. झोपण्याची स्थिती हे सर्वात महत्त्वाचे असते. काही वेळा महिलांना बसून झोपणे सोयीचे होते. अशा परिस्थिती झोपणे त्यांच्यासाठी खूप आरामदायक असू शकते. काही लोकांना झोपेत असताना श्वास घेण्यास त्रास होतो. अशा परिस्थितीत बसून झोपल्याने श्वास घेण्यास अडचण येत नाही. मात्र, अन्य लोकांसाठी अशी सवय हानिकारकच ठरू शकते.

हे ही वाचा :

Health : खुर्चीतच बसून झोपण्याचे ‘हे’ आहेत साईड इफेक्टस्!

श्रीक्षेत्र जोतिबा परिसर संवर्धन प्राधिकरणासाठी 50 कोटी

Back to top button