G7 Summit 2023 : चीनला आव्हान; ड्रॅगनच्या कोंडीसाठी जी-७ देश एकत्र; मोदीही होणार सहभागी | पुढारी

G7 Summit 2023 : चीनला आव्हान; ड्रॅगनच्या कोंडीसाठी जी-७ देश एकत्र; मोदीही होणार सहभागी

टोकियो; वृत्तसंस्था : जपानच्या हिरोशिमा शहरात 19 मेपासून जी-7 सदस्य देशांची बैठक सुरू होणार आहे. दक्षिण चिनी समुद्रासह हिंद महासागरातील चीनच्या विस्तारवादाविरुद्ध तसेच वाढत्या आर्थिक प्रभावाविरुद्ध या बैठकीत धोरण आखले जाईल. सर्व देश मिळून एक संयुक्त निवेदनही जारी करतील. (G7 Summit 2023)

गतवेळी झालेल्या बैठकांतील संयुक्त निवेदनाप्रमाणे ते सौम्य असणार नाही. कठोर तसेच निर्णायकही असेल. सर्व जी-7 देशांच्या प्रमुखांसह भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीही या बैठकीत सहभागी होणार आहेत. (G7 Summit 2023)

अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या परराष्ट्र धोरणाचा भर चीनच्या प्रतिकारावर आहे. चीनच्या बाबतीत बायडेन हे डोनाल्ड ट्रम्प यांचाचा वारसा पुढे चालवत आहेत. ट्रम्प यांनीही चीनसंदर्भात अनेक प्रश्न उपस्थित केले होते. गेल्या महिन्यात जी-7 देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांची बैठक भारतात झाली होती. तेव्हाही चीनचा विषय निघाला होता. (G7 Summit 2023)

कराराचा भाग म्हणून सर्वच देशांनी चीनविरुद्ध कठोर पावले उचलावीत, अशी अमेरिकेची अपेक्षा असते; पण भारत, जपान हे अपवाद वगळता इतर देशांना या भानगडीत फारसे स्वारस्य नाही.
– जोश लिपस्की,
वरिष्ठ संचालक, जिओ इकॉनॉमिक सेंटर, अटलांटिक कौन्सिल

इमॅन्युएल मॅक्राँकडे जगाचे लक्ष

  • फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्राँ हे नुकतेच चीन दौर्‍यावर होते. तेथून परतल्यानंतर त्यांनी चीनच्या ‘वन चायना’ या विस्तारवादी धोरणाला पाठिंबाही जाहीर केला होता.
  • ओझरता का असेना; पण अमेरिकेविरोधात कौलही मॅक्राँ यांनी दिला होता. त्यामुळे जी-7 चा फ्रान्स हा सदस्य देश चीनबाबत काय भूमिका घेतो, त्याकडे जगाचे लक्ष असेल.

अधिक वाचा :

Back to top button