Parineeti Chopra and Raghav Chadha Engagement : परिणिती चोप्रा आणि राघव चड्ढांचा पार पडला साखरपुडा; पहा फोटो

Parineeti Chopra and Raghav Chadha Engagement : परिणिती चोप्रा आणि राघव चड्ढांचा पार पडला साखरपुडा; पहा फोटो

पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेत्री परिणिती चोप्रा आणि आपचे खासदार राघव चड्ढा यांचा शनिवारी (दि. १३) साखर पुडा पार पडला. या साखरपुड्याला मनोरंजन क्षेत्रातील मान्यवरांसह राजकीय क्षेत्रातील नेतेमंडळींनी सुद्धा हजेरी लावली. अनेक फुलांनी आणि विद्युत रोषणाईने सजवलेल्या दिल्लीतील कपूरथला हाऊसमध्ये हा साखरपुडा संपन्न झाला. साखरपुडा झाल्या झाल्या परिणिता आणि राघव यांच्या एकत्रित फोटो व्हायरल होत आहेत. (Parineeti Chopra and Raghav Chadha Engagement)

दरम्यान या कार्यक्रमास पाहुण्यांसोबत अभिनेत्री प्रियांका चोप्रापासून ते दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी सुद्धा या साखपुडा कार्यक्रमास हजेरी लावली होती. साखरपुड्याच्या निमित्ताने सजवलेले वधू-वरांची जोडी खूपच सुंदर दिसत होती. (Parineeti Chopra and Raghav Chadha Engagement)

राघव-परिणितीने शनिवारी नवी दिल्लीतील कपूरथला हाऊसमध्ये कुटुंबीय आणि मित्रांच्या उपस्थितीत एकमेकांना अंगठी घालून साखपुडा साजरा केला. कार्यक्रमाची सुरुवात शिखांची पारंपारिक प्रार्थना 'अरदास'ने झाली. भजन गाऊन नवे जोडपे गुरुद्वाराच्या दिशेने निघाले. (Parineeti Chopra and Raghav Chadha Engagement)

सायंकाळी ५ वाजता शीख धर्मग्रंथ गुरु ग्रंथ साहिबच्या काही भागाचे शुकुमणी साहिब यांनी पठण केले. यानंतर प्रार्थना सुरू झाली. राघव-परिणिती यांनी हा खास दिवस खास बनवण्यात कोणतीही कसर सोडली नव्हती.

पाहुण्यांची मांदियाळी

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यासह काँग्रेस नेते पी. चिदंबरम, आदित्य ठाकरे, आप नेता संजय सिंह या मान्यवरांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली. तसेच बॉलिवूड स्टार्सनी हजेरी लावली होती. एकूण, आमंत्रित अतिथींची संख्या सुमारे 150 हून अधिक लोकांची होती. प्रियंका चोप्रा याआधीच बहिणीच्या साखरपुड्याच्या निमित्ताने भारतात आली आहे.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम
आदित्य ठाकरे
आदित्य ठाकरे


अधिक वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news