Cyclone Mocha : ‘मोचा’चा जगातील सर्वात मोठ्या रोहिंग्या मुस्लिम छावणीला धोका

Cyclone Mocha : ‘मोचा’चा जगातील सर्वात मोठ्या रोहिंग्या मुस्लिम छावणीला धोका

नवी दिल्ली / ढाका; वृत्तसंस्था : मोचा चक्रीवादळाचा फटका रविवारी बांगलादेश-म्यानमार सीमेवर असलेल्या रोहिंग्या मुस्लिमांच्या जगातील सर्वात मोठ्या छावणीला बसू शकतो. वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशनने हा इशारा दिला आहे. पूर किंवा भूस्खलन झाल्यास मोठी हानी शक्य आहे. निर्वासित छावणीत सुमारे 8 लाख 80 हजार रोहिंग्या मुस्लिम राहतात, हे विशेष! (Cyclone Mocha)

चक्रीवादळ गेल्या 6 तासांत 15 कि.मी. प्रतितास वेगाने पुढे सरकत असून, 14 मे रोजी ते दुपारी बांगलादेशातील कॉक्स बाजार आणि म्यानमारमधील क्युकप्यू भाग ओलांडेल, अशी शक्यता आहे. वार्‍याचा वेग या दरम्यान ताशी 150-160 कि.मी. प्रतितास ते 175 कि.मी. पर्यंत असू शकतो, असे भारतीय हवामान विभागाने सांगितले. (Cyclone Mocha)

डब्ल्यूएचओकडून मदत (Cyclone Mocha)

रोहिंग्या निर्वासित शिबिरांमध्ये 33 फिरती वैद्यकीय पथके, 40 रुग्णवाहिका तसेच आपत्कालीन शस्त्रक्रिया आणि कॉलरा किट पाठवण्याची तयारी जागतिक आरोग्य संघटनेकडून सुरू झाली आहे. म्यानमारच्या रखाईन प्रांतातील सखल भागात राहाणारे लोक आपली घरेदारे सोडून शुक्रवारी राजधानीत दाखल झाले आहेत. हजारो लोकांनी बौद्ध मठांतून आश्रय घेतला आहे.

भारतात 3 ठिकाणी अलर्ट

अंदमान-निकोबार, पश्चिम बंगाल आणि ओडिशामध्ये अलर्ट जारी करण्यात आला असून, बंगालमधील दिघा येथे एनडीआरएफची 8 पथके आणि 200 बचाव कर्मचारी तैनात आहेत.

अधिक वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news