3-D mini eye : कृत्रिम डोळ्याने पाहा जग; शास्त्रज्ञांनी केला ‘थ्री-डी मिनी आय’ | पुढारी

3-D mini eye : कृत्रिम डोळ्याने पाहा जग; शास्त्रज्ञांनी केला ‘थ्री-डी मिनी आय’

लंडन; वृत्तसंस्था :  (3-D mini eye)लंडन युनिव्हर्सिटीच्या प्रयोगशाळेतील शास्त्रज्ञांनी कृत्रिम डोळा तयार केला असून, तो नैसर्गिक मानवी डोळ्याप्रमाणे काम करेल. याला शास्त्रीय परिभाषेत ‘थ्री-डी मिनी आय’ असे संबोधले जाते. हा कृत्रिम डोळा बनवण्यासाठी मानवी त्वचेचा वापर करण्यात आला असून, त्यामध्ये डोळ्याची बाहुली आणि द़ृष्टिपटलदेखील आढळते.

शास्त्रज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, याआधी कृत्रिम डोळा (3-D mini eye) तयार करण्यासाठी प्राण्यांच्या पेशींवर संशोधन करण्यात आले होते. तथापि, त्याचा फायदा झाला नव्हता. मात्र, मानवी त्वचेपासून तयार करण्यात आलेल्या मिनी आयमधून अनेक गोष्टी शोधल्या जाऊ शकतात. एखाद्या व्यक्तीची पाहण्याची क्षमता कशामुळे जाते, हे शोधण्याचा शास्त्रज्ञ प्रयत्न करत आहेत. याशिवाय डोळ्यांशी संबंधित अनुवांशिक आजारांसंदर्भात संशोधनही सुरू आहे, यामुळे भविष्यात डोळ्यांसंबंधित आजारांवरील उपचारात मदत होऊ शकेल. शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, मिनी आयवरील संशोधनामुळे वयाच्या पन्नाशीनंतर होणार्‍या डोळ्यांच्या आजारांवर निश्चितपणे उपाय शोधला जाऊ शकतो.

‘स्टेम सेल रिपोटर्स जर्नल’मध्ये प्रकाशित झालेल्या एका संशोधनानुसार, हा थ्री-डी मिनी डोळ्यातील (3-D mini eye) रॉड सेल्स म्हणजेच दंड पेशी डोळ्यांच्या द़ृष्टिपटलामध्ये तयार करण्यात आल्या आहेत. डोळ्यांच्या मागील भागात या पेशी आढळतात. कोणत्याही व्यक्तीला वस्तू पाहण्यास किंवा त्याचे द़ृश्य अथवा प्रतिमा तयार करण्यास मदत करणे हे या पेशींचे मुख्य कार्य होय. या पेशींमुळे प्रतिमा पाहणे सुलभ होत जाते. प्रयोगशाळेत तयार करण्यात आलेल्या डोळ्यांमध्येही अशाप्रकारचे तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे.

किमयागार शास्त्रज्ञ

‘डेली मेल’च्या वृत्तानुसार, मिनी आय (3-D mini eye) तयार करण्यासाठी, शास्त्रज्ञांनी अशर सिंड्रोमने पीडित तरुण रुग्णाच्या त्वचेच्या पेशी गोळा केल्या. यापासून स्टेम सेल्स तयार करण्यात आले. त्यानंतर प्रयोगशाळेत कृत्रिम डोळा बनवण्याची प्रक्रिया सुरू झाली. यामध्ये शास्त्रज्ञांनी हळूहळू संशोधन करत कृत्रिम डोळ्यात सात प्रकारच्या पेशी तयार केल्या, ज्याचा पातळ थर प्रकाश ओळखून प्रतिमा तयार करू शकतो.

हेही वाचा :  

Back to top button