International Film Festival : ‘काश्मिर फाईल्स’ असभ्य, दुष्प्रपचार करणारा चित्रपट; इफ्फीच्या मुख्य ज्युरींची टीका

पणजी; पुढारी ऑनलाईन : इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडियाच्या ज्युरी प्रमुखांनी ‘द काश्मीर फाइल्स’चे वर्णन ‘असभ्य आणि दुष्प्रचारक चित्रपट’ असे केले आहे. काश्मीर फाइल्स (The Kashmir files) हा दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांचा चित्रपट आहे. इस्रायलचे चित्रपट निर्माते आणि भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे (IFFI) ज्युरी प्रमुख नदाव लॅपिड यांनी याला दुष्प्रचार करणारा चित्रपट म्हटले आहे. या चित्रपटाचा निषेध करत त्यांनी याला असभ्य सुद्धा म्हटले. (International Film Festival)
विशेष म्हणजे चित्रपट महोत्सवात या चित्रपटाचे प्रदर्शन पाहून ज्युरी आश्चर्यचकित झाले. ज्युरी म्हणाले की, हा चित्रपट पाहून आम्हा सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. हे पाहून आम्हाला वाटले की हा केवळ प्रसिद्धी स्टंट करणारा आणि असभ्य चित्रपट आहे. या प्रकारचे चित्रपट एखाद्या सुप्रसिद्ध चित्रपट महोत्सवाच्या कलात्मक, स्पर्धात्मक प्रकारात शोभत नाहीत. (International Film Festival)
असभ्य श्रेणीतला चित्रपट (International Film Festival)
गोव्यात साजऱ्या होत असलेल्या ५३ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात बड्या कलाकारांनी सहभाग घेतला आहे. पण, याच दरम्यान ज्युरी आणि इस्रायली चित्रपट निर्माते नदाव लॅपिड यांनी विवेक अग्निहोत्रीच्या ‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटाबाबत दुष्प्रचारक करणारा म्हटल्यावर मात्र तेव्हा सर्वांनाच धक्का बसला. खरं तर, या चित्रपटाबाबत विवेक अग्निहोत्रीचा दावा आहे की, ‘द काश्मीर फाइल्स…’ मधून त्यांनी काश्मिरी पंडितांची दुर्दशा दाखवली आहे. या चित्रपटाने थिएटरमध्येही चांगला व्यवसाय केल्याची माहिती आहे. पण इस्त्रायली चित्रपट निर्मात्याने याचे वर्णन असभ्य श्रेणीचा चित्रपट असे केले आहे. (International Film Festival)
A sensitive issue of justice for Kashmiri Pandits was sacrificed at the altar of propaganda. This is a must listen segment at the #IFFIGoa2022 : pic.twitter.com/zd1WgKoUNa
— Priyanka Chaturvedi🇮🇳 (@priyankac19) November 28, 2022
विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द कश्मीर फाईल्स’ या चित्रपटात काश्मिरी पंडितांवर ९० च्या दशकात झालेल्या अत्याचाराची गोष्ट दाखवण्यात आली आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर हिट ठरला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ३४० कोटींची कमाई केली आहे.
दुसरीकडे, नदव लॅपिडच्या वक्तव्याबाबत पीडीपीचे प्रवक्ते मोहित भान म्हणाले की, हा चित्रपट द्वेष पसरवण्याच्या उद्देशाने बनवण्यात आला आहे.
इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया (IFFA) हा चित्रपट महोत्सव भारत सरकारद्वारे आयोजित केला जातो. इफ्फी सोहळ्यात इस्रायली चित्रपट निर्माते नदाव लॅपिड हे मुख्य ज्युरी म्हणून सहभागी झाले होते. समारंभाचा समारोप सोहळा होत असताना आणि भारत सरकारमधील मंत्रीही तिथे उपस्थित असताना लॅपिड यांनी काश्मीरच्या फायल्स सिनेमा या चित्रपट महोत्सवात दाखवल्या बद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली.
अधिक वाचा :