राफेल ‘घमासान’ : ‘त्या’ गौप्यस्फोटावर फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष म्हणतात मला काय त्यातलं माहित नाही!  | पुढारी

राफेल 'घमासान' : 'त्या' गौप्यस्फोटावर फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष म्हणतात मला काय त्यातलं माहित नाही! 

संयुक्त राष्ट्रसंघ : पुढारी ऑनलाईन 

सध्या देशात चर्चेचा आणि राजकीय वादाचा केंद्रबिंदू झालेल्या राफेल करारावरून दररोज नवनवीन खुलासे आणि गौप्यस्फोट होत आहेत. आता यामध्ये फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रोन यांनी रिलायन्सला भागीदार करून घेण्याच्या निर्णयावर अधिक भाष्य टाळताना मी काही त्यावेळी सत्तेत नव्हतो, त्यामुळे मला काही त्यातलं काही माहित नाही अशी भूमिका मांडली आहे.  

वाचा : ‘…तर मोदी माझ्या नजरेस नजर मिळवणार नाहीत’ 

राफेल विमान करार दोन्ही सरकारांनी घेतलेला निर्णय होता, असेही मॅक्रोन यांनी नमूद केले. राफेल करारावरून फ्रान्सचे माजी राष्ट्राध्यक्ष फ्रान्स्वा ओलांद यांनी मोठा गौप्यस्फोट करताना फ्रान्सची कंपनी डसाऊल्टसोबतच्या भागीदारीसाठी भारत सरकारकडून रिलायन्स या एकमेव कंपनीचे नाव आले होते त्यामुळे आमच्यासमोर कोणताच पर्याय नव्हता असे म्हटले होते. फ्रान्सच्या दसाउल्ट कंपनीसोबत भारत सरकारने राफेल विमान खरेदी करार केला आहे. या कंपनीची भारतीय भागीदार कंपनी रिलायन्स आहे.

वाचा : चौकीदाराकडून अनिल अंबानींमार्फत चोरी

मॅक्रोन यांना पत्रकार परिषदेमध्ये रिलायन्सच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यासाठी भारत सरकारकडून फ्रान्सला किंवा दसाऊल्ट कंपनीला सांगण्यात आले होते का असे विचारण्यात आले. त्यावेळी ते म्हणाले की, मी या मुद्यावर स्पष्ट बोलू इच्छितो की, हा दोन सरकारमधील करार आहे. मी त्यावेळी सत्तेत नव्हतो, आमच्याकडे स्पष्ट नियम आहेत आणि हा दोन सरकारमधील निर्णय आहे. तो एक व्यापक मांडणीचा भाग आहे. ही दोन्ही देशांमधील लष्कर आणि सुरक्षेची ती आघाडी आहे. 

वाचा : अंबानी आणि मोदींनी ‘केला’ संरक्षण दलासह १३० कोटी जनतेवर ‘सर्जिकल स्ट्राईक’!

गेल्यावर्षी मे महिन्यात इमॅन्युएल मॅक्रोन यांची फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षपदी विराजमान झाले आहेत. ते फ्रान्सचे सर्वांत तरुण राष्ट्राध्यक्ष आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राफेल कराराची घोषणा २०१६ मध्ये केली होती. तत्कालिन फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष फ्रान्स्वा ओलांद होते. फ्रान्सच्या दोन्ही राष्ट्राध्यक्षांनी राफेल करारावरून रिलायन्सवरू अशी भूमिका घेतल्याने चर्चेला अधिकच उधाण आले आहे. 

वाचा : राफेल प्रकरणी ‘चौकीदार चोर निघाले’; राहुल गांधींचा हल्लाबोल

Back to top button