cooking food in water : भाजी पाण्यात शिजवताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा | पुढारी

cooking food in water : भाजी पाण्यात शिजवताना 'या' गोष्टी लक्षात ठेवा

स्वयंपाकघरात बरेच पदार्थ आपण पाण्यात घालून उकळवतो आणि शिजवतो. असे पाण्यात घालून पदार्थ शिजवताना काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात. (cooking food in water)

पदार्थ उकळवून शिजवायचा असल्यास तो पूर्ण शिजेपर्यंत पाण्यात संपूर्ण बुडालेला असावा; अन्यथा पाणी कमी झाल्यास तो जळण्याची किंवा तळाशी चिकटण्याची शक्यता असते. मटार, शेवग्याच्या शेंगा किंवा तत्सम कुठल्या भाज्या उकळवताना वर येणारा फेस काढून टाकावा. म्हणजे पदार्थाची चव आणि रंग बदलत नाही; अन्यथा फेसामुळे पदार्थाची चव तर बिघडतेच, शिवाय रंगही बदलतो. कुठलाही पदार्थ भांडी घेऊन उकळवताना त्यावर पूर्ण झाकण ठेवू नये. वाफ जाण्यासाठी भांडे थोडे उघडे ठेवावे म्हणजे उकळी येऊन पाणी बाहेर येणार नाही. मांसाहारी पदार्थ म्हणजे चिकन, मटण पाण्यात शिजवताना त्यात काही भाज्या घालाव्यात. त्यामुळे अधिक चांगली चव येते.

ज्या पाण्यात भाज्या, चिकन उकळवेलेले असते, ते पाणी भरपूर प्रमाणात पोषकतत्त्वे असणारे असते. त्यामुळे ते फेकून न देता सूप किंवा इतर पदार्थांसाठी ते वापरावे. कंदमुळे शिजवताना आधी त्यावर गार पाणी घालावे आणि नंतर शिजवावे. यामुळे त्यांची चव वाढते. मासे शिजवण्यासाठी पाण्यात घातल्यानंतर त्यास उकळी येऊ देऊ नये. मासे शिजवण्यासाठी गरम पाणी पुरेसे असते. तसेच अंडे उकडताना पाण्यात थोडेसे मीठ घालावे. म्हणजे साल फुटून आतील पांढरा भाग बाहेर येत नाही. हरव्या भाज्या पाण्यात थोड्याशा उकळवून बाहेर काढाव्यात. नंतर त्याची भाजी करावी. यामुळे उकळवलेले पाणी आणि पाला असे दोन्ही पौष्टिक घटक आपल्याला मिळतात. हे पाणी थोडेसे मीठ, जिरेपूड टाकून प्यावे. (cooking food in water)

हेही वाचा; 

Back to top button