Mumbai-Goa Highway Accident | रत्नागिरी : निवळी घाटात गॅसवाहू टँकर उलटला; मुंबई-गोवा मार्गावरील वाहतूक ठप्प

Mumbai-Goa Highway Accident | रत्नागिरी : निवळी घाटात गॅसवाहू टँकर उलटला; मुंबई-गोवा मार्गावरील वाहतूक ठप्प

रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर निवळी घाटात गॅस वाहून नेणारा टँकर उलटून अपघाताची घटना घडली. शनिवारी (दि. १२) दुपारी २ वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातानंतर महामार्गावरील दोन्ही बाजूंची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. (Mumbai-Goa Highway Accident)

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर निवळी घाट उतरत असलेला गॅस वाहू टँकरचा अपघात झाला. महामार्गावर मधोमध आडवा झाल्याने मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद पडली आहे. पर्यायी मार्ग असल्याने महामार्गावर दोन्ही बाजूने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news