चवीचा इतिहास : पालक पनीर मुळात आहे ग्रामीण पदार्थ! | पुढारी

चवीचा इतिहास : पालक पनीर मुळात आहे ग्रामीण पदार्थ!

चवीचा इतिहास - पालक पनीर (Palak Paneer) मुळात आहे ग्रामीण पदार्थ!

पु‍ढारी ऑनलाईन डेस्क : पनीरचे विविध पदार्थ आपण चवीने खातो. हॉटेलमध्ये गेल्यानंतर पनीरच्या विविध पदार्थांनी मेन्युकार्ड सजलेले असते. पनीर टिक्का, बटर पनीर, पनीर तवा मसाला, पनीर भुर्जी असे कितीतरी पदार्थ आपल्या सवयीचे आहेत. यातीलच एक डिश म्हणजे पालक पनीर (Palak Paneer). पौष्टिक आणि चवदार असणारी डिश आज शहरातील सगळ्या नामवंत हॉटेलमध्ये सहज मिळते. अनेक शहरी लोकांनी ही डिश आपलीशी केली आहे. पण या डिशची गंमत अशी आहे ही मुळात ग्रामीण भागातील डिश आहे. आणि नंतर ती शहरी भागांना या डिशने आपलेसे केले.

पालक पनीर ही डिश मुळची पंजाबची आहे. पंजाबचा प्रांत हा अत्यंत सुपीक आहे. चिनाब, सतलज, रावी, बियास, झेलम अशा नद्यांमुळे पंजाबचा प्रांतात जमीन कसदार बनल्या आहेत. दूध आणि इतर दुग्धजन्य पदार्थांचा वापर येथील दैनंदिन जीवनाचा भाग आहे. लस्सी, ताक, तूप, पनीर हे पंजाबच्या रोजच्याच जेवणाचा भाग बनलेले आहेत.

असं मानलं जात की, भारतात पालक फार नंतर आली. त्यापूर्वीपासून मोहरी स्थानिक भाजी म्हणून प्रचलित होती. पंजाबमध्ये पनीर साग ही भाजी प्रसिद्ध आहे. मोहरीची भाजी आणि पनीर असे हे काँबिनेशन आहे. पनीर सागचे पुढचे रूप म्हणजे पालक पनीर असे मानले जाते. मोहरीची भाजी ही थंडीच्या दिवसांत उपलब्ध होते, त्यामुळे साग पनीर ही भाजी पंजाबमध्ये थंडीच्या दिवसांत खाल्ली जाते.

मोहरी आणि पालक जेव्हापासून भारतीय उपखंडात आले, तेव्हापासून ते गरीबांची भाजी म्हणून त्यांची सुरुवातीची ओळख होती. पंजाब प्रांतात या भाज्यांना अधिक पौष्टिक करण्यासाठी त्यात पनीरचा वापर करून नव्या प्रकारचे पदार्थ बनवण्यात आले. दिवसभर शेतात काबाडकष्ट करणाऱ्यांसाठी पालक पनीर किंवा पनीर साग अशा भाज्या शरीरासाठी आवश्यक असणारे प्रथिने आणि इतर पौष्टिक घटकांची गरज पूर्ण करणाऱ्या होत्या. ग्रामीण पंजाबमधून या डिश शहरी पंजाबमध्ये आणि तेथून देशभर पोहोचल्या.

हेही वाचा

Back to top button