Salt & Food: मीठ ‘वरून’ खाताय सावधान…आरोग्याच्या दृष्टीने ठरू शकते घातक | पुढारी

Salt & Food: मीठ 'वरून' खाताय सावधान...आरोग्याच्या दृष्टीने ठरू शकते घातक

पुढारी ऑनलाईन: पदार्थांमध्ये ‘वरून’  अतिरिक्त  मीठ  घालूण खाण्याची तुम्हाला देखील सवय आहे का?  अशी सवय तुम्‍हाला असेल तर ती घातक ठरू शकते. ( Salt & Food ) नुकत्याच अमेरिकेतील बायोबँक प्रकल्पांतर्गत करण्‍यात आलेले अभ्यासातील माहितीनुसार, खाद्‍यपदार्थांमध्ये ‘वरून’ मीठ खाण्याची सवय असल्यास तुमचा अकाली मृत्यू ओढविण्याची शक्‍यता वाढते. अमेरिकेत झालेल्या एका संशोधनात हा दावा करण्यात आला आहे.

संशाेधनात स्‍पष्‍ट झाले अआहे की,  जे लोक पदार्थांमध्ये ‘वरून’ मीठ खातात, त्यांना अकाली मृत्यूचा धोका हा २८ टक्क्यांनी वाढतो. नुकत्याच युरोपियन हार्ट जर्नलच्या अंकात प्रसिद्ध झालेल्या एका अहवालानुसार, सर्वसामान्य लोकसंख्येतील १०० पैकी तीन जणांना यामुळे जीव गमवावा लागत असल्याची माहिती या अभ्‍यासातून समोर आली आहे.

बायोबँक प्रकल्पांतर्गत अभ्यासादरम्यान व्यक्तींना अनेक प्रश्न विचारण्यात आले. या प्रश्‍नांचे स्‍वरुप असे हाेते : अन्नात अतिरिक्त मीठ घालता का?, टेबलवर बसल्यानंतर पदार्थांमध्ये वरून मीठ घेता का?, पदार्थांमध्ये वरून किती मीठ वापरता? पदार्थामध्ये कोणत्या प्रकारचे मीठ वापरता?.

हा अभ्यास 2006 ते 2010 या कालावधीत करण्यात आला हाेता. आता या प्रश्‍नांची उत्तरे देण्‍याची पाहणी  केली. यावरुन जे लोक आहारात किंवा पदार्थात वरून अतिरिक्त मीठ घालतात त्यांचे आयुर्मान इतरांपेक्षा कमी झाले. तर दुसऱ्या श्रेणीत जे लोक वरून मीठ खात नाहीत त्यांचे आरोग्य चांगले असून, त्यांना मृत्यूचा धोका कमी असल्याचे आढळून आले.

Salt & Food : हा असू शकतो पर्याय

काही प्रमाणात मानवी शरीरासाठी मीठ आवश्यक आहे. तसच अन्नास चवदार बनविण्यासाठी मीठ आवश्यक असते. तुम्हाला जर जेवणातून मीठ खायची सवय असेल तर सैंधव मीठ वापरण्याचा सल्ला अनेक डॉक्टर आणि आहारतज्ज्ञ देतात. तसेच आयुर्वेदाच्या दृष्टीने हे मीठ खाणे हे तुमच्यासाठी आरोग्यदायी ठरू शकते.

(Image : Google)

पॅकेटबंद पदार्थांपासून सर्वाधिक धोका

तज्ज्ञांच्या मतानुसार, पॅकेटबंद खाद्यपदार्थांमध्ये सोडिअमचे प्रमाण मोजणे शक्य नसते. या प्रक्रिया केलेल्या पदार्थांमध्ये मोठया प्रमाणात मीठ असू शकते. दुसऱ्या बाजूला डायनिंग टेबलवर बसल्यानंतर जेवणात वरून मीठ घेणे ही तुमची सवय सामान्य असू शकते; पण हीच सवय तुमच्या आरोग्याला नुकसान पोहचवू शकते. त्यामुळे ही सवय हळूहळू बदलणे हे तुमच्यासाठी आरोग्यदायी ठरेल.

हेही वाचा:

Back to top button