Chicken Sweet Corn Soup : काही मिनिटांमध्‍ये बनवा स्वीट कॉर्न चिकन सूप | पुढारी

Chicken Sweet Corn Soup : काही मिनिटांमध्‍ये बनवा स्वीट कॉर्न चिकन सूप

पुढारी ऑनलाईन डेस्क :

जेव्हा कधी तुम्‍हाला हलकं आणि टेस्टी खायचं मूड झाला की, येतं सूप.  चवदार टेस्‍टबराेबरच सूप आरोग्यासाठी फायदेशीरही ठरतं. व्हेज, नॉनव्हेज, चायनीज अशी सूपमधील  रेसीपी पाहायला मिळते. आज आपण २० मिनिटांत होणारं स्वीट कॉर्न चिकन सूप (Chicken Sweet Corn Soup) कसं करायचं ते जाणून घेवूया…

Chicken Sweet Corn Soup –साहित्य :

  • चिकन शिजवल्‍यानंतर भांड्यातील ५ ते ६ कप पाणी
  • २ चमचे कांदा, लसुण, आल्याची पेस्ट
  • दीड कप क्रीम ऑफ कॉर्न (क्रीम ऑफ कॉर्न –  बटरमध्ये स्वीट कॉर्न भाजून घेवून त्यामध्ये चवीपुरती साखर, मीठ आणि मिल्क पावडर मिक्स करून केलेली पेस्ट)
  • १ चमचा मीठ
  • १  चमचा साखर
  • अर्धा चमचा मिरेपूड
  • ३ ते ४ चमचे  कॉर्नफ्लोअर
  • एक उकडलेले अंडे (त्यातील फक्त पांढरा भाग)
  • १ अंडे (फक्त पांढरा भाग)
  • १ वाटी शिजलेले चिकन

 स्वीट कॉर्न चिकन सूपची रेसीपी-Chicken Sweet Corn Soup :

१) पहिल्यांदा चिकन क्रीम ऑफ कॉर्न घालून उकळून घ्यावे.

२) ४ ते ५ मिनिटे ते चांगले उकळू द्या. नंतर त्यामध्ये चवीपुरते मीठ, साखर व मिरे पावडर घाला.

३) ५ मिनिटे ते मंद आचेवर उकळू द्या.  कॉर्नफ्लोअरची पेस्ट करून घ्या. ती हळूहळू उकळत्या सूपमध्ये घालत ढवळत राहा.

४) पाच ते सहा मिनिटे हे मिश्रण उकळू द्या. चांगल्या उकळ्यानंतर उकडलेल्या अंड्याचे पांढरे बल्क फेटुन ते त्या मिश्रणात मिक्स करून घ्या व ५  मिनिटे ढवळत राहा.

५)  शिजलेले चिकनच्‍या पाण्‍यात १ वाटी चिकन घालावे .  मंद आचेवर हे सर्व गॅसवर उकळू द्या. ५ मिनिटांनी गॅस बंद करा.  गरमा गरम  स्वीट कॉर्न चिकन सूप तयार. (Chicken Sweet Corn Soup recipe)

टीप : हे सूप पुन्हा-पुन्हा गरम करू नये.

हेही वाचलतं का?

Back to top button