chicken noodle soup : अवघ्या काही मिनिटांमध्‍ये बनवा ‘चिकन नूडल सूप’ | पुढारी

chicken noodle soup : अवघ्या काही मिनिटांमध्‍ये बनवा 'चिकन नूडल सूप'

पुढारी ऑनलाईन डेस्क :

जेवणापूर्वी सपू घेणं आता काॅमन हाेत आलयं. बहुतांशवेळा तुम्‍ही हाॅटेलमध्‍ये जेवायला गेला तर सूप ऑर्डर करताच. काही सूपची नाव ऐकली की तुम्‍हाला वाटतं यासाठी जास्‍त पैसे माेजावे लागणार. अशातीलच एक नाव म्‍हणजे ‘चिकन नूडल सूप’ (chicken noodle soup).  मात्र तसं अजिबात नाहीय. तुम्ही घरच्या घरी कमीत-कमी साहित्यामध्ये  ‘चिकन नूडल सूप’ अवघ्या काही मिनिटांमध्‍ये करू शकता. चला तर मग जाणून घेवूया तुमच्‍या जिभेची चवच बदलणार्‍या या सूपची रेसीपी…

chicken noodle soup : आवश्‍यक साहित्‍य

  •  बारीक तुकडे केलेले अर्धा कप शिजवलेले चिकन
  •  शिजवलेले नुडल्स १ कप
  • बारीक चिरून उकडून घेतलेला अर्धा कप कोबी
  • चिकन-स्टॉक ५ ते ६ कप
  • १ चमचा  सोयासॉस
  • १ चमचा रिफाईंड तेल
  • १ चमचा कॉर्नफ्लोअर
  • अर्धा चमचा लाल मिरची पावडर
  • चवीप्रमाणे मीठ
  • अर्धा चमचा काळी मिरची पावडर

 ‘चिकन नूडल सूप’ची कृती  :

१. प्रथमत: एका भांड्यात रिफाईंड तेल घालून बारीक तुकडे केलेले शिजलेले चिकन थोडावेळ परतून घ्यावे.

२. थोड्यावेळाने बारीक चिरून उकडून घेतलेला कोबी मिक्स करून परतून भाजून घ्यावा.

३. चिकन आणि कोबीमध्ये चिकन-स्टॉक घालून उकळावे

४.थोड्यावेळाने चवीपुरते मीठ, तिखट मिरेपूड, सोयासॉस अजिनोमोटो घालून थोडावेळ उकळून घ्यावे. त्यामध्ये शिजवून घेतलेल्या  नूडल्स  घालाव्या. त्यानंतर थोडीशी कोथंबीर घालावी (जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही चिरलेला टोमॅटोही घालू शकता)

५. कपभर पाण्‍यात केलेली कॉर्नफ्लोअरची पेस्ट घालून सूप काहीवेळ उकळून घ्यावे.

काही मिनिटांमध्ये तयार झालेले हे ‘चिकन नूडल सूप’ (chicken noodle soup)  तुम्ही हे बर्थडे पार्टी, कीटी पार्टी, नाष्ट्यासाठी देवू शकता.

हेही वाचलतं का? 

 

Back to top button