Egg Kheema Curry : ३१ डिसेंबरची पार्टी; अंडा-खिमाकरीने बनवा खास | पुढारी

Egg Kheema Curry : ३१ डिसेंबरची पार्टी; अंडा-खिमाकरीने बनवा खास

पुढारी ऑनलाईन डेस्क :  Egg Kheema Curry : सध्या कडाक्याच्या थंडीचे दिवस सुरू असून या दिवसांत खवय्ये मांसाहार करण्यावर जास्त भर दिला जातो. मांसाहारप्रेमी खाण्याचे इतके शौकिन असतात की, जेवणाच्या शेवटी बोटं चाटत राहतात. यासोबत नुकतेच २०२३ वर्ष संपणार असून नववर्षाला २०२४ ला सुरूवात होणार आहे. यादरम्यान घरात मांसाहार करण्याची चर्चा रंगते. कोण- कोण मटण, चिकन, मासे तर कोण अंडीच्या जेवणात बेत आखतात. यासाठी खास करून ३१ डिसेंबरला आपण मांसाहारप्रेमींसाठी वेगळी रेसिपी पाहणार आहे. त्या रेसिपीचं नाव आहे अंडा-खिमाकरी. चला तर अंडा-खिमाकरीची रेसिपी पाहूयात… (Egg Kheema Curry)

No Image

Recipe By अनुराधा कोरवी

Course: डिनर Cusine: महाराष्ट्रीयन Difficulty: : सोपे

Servings

५ minutes

Preparing Time

३० मिनिट minutes

Cooking Time

३० मिनिट minutes

Calories

kcal

INGREDIENTS

  1. मटणाचा खिमा- पावशेर

  2. उकडलेली अंडी- चार

  3. हिरवा मटर- पावशेर

  4. तेल- तीन चमचे

  5. आलं-लसूण पेस्ट- एक चमचा

  6. टोमॅटो प्यूरी- अर्धा कप

  7. बारीक चिरलेला कांदा- अर्धा कप

  8. लाल मिरच्या- दोन

  9. तमालपत्र-दोन

  10. जिरे-अर्धा चमचा

  11. हळद-चिमूटभर

  12. मिरची पावडर-अर्धा चमचा

  13. धने पावडर-अर्धा चमचा

  14. गरम मसाला-अर्धा चमचा

  15. मटण मसाला-अर्धा चमचा

  16. बारीक चिरलेली कोथिंबीर-चार चमचे

DIRECTION

  1. पहिल्यांदा गॅसच्या आचेवर कढई ठेवून तेल गरम करून घ्यावे.

  2. गरम झालेल्या तेलात जिरे, तमालपत्र आणि लाल मिरच्या घालावे.

  3. त्यानंतर आलं-लसूण पेस्ट टाकून गरम करून घ्या.

  4. त्यानंतर बारीक चिरलेला कांदा टाकून ब्राऊन रंग येईपर्यंत परतून घ्या.

  5. त्यात टोमॅटो प्यूरी परतवा.

  6. जेव्हा पेस्ट तेलापासून बाजूला होईल तेव्हा खिमा टाका आणि ५ मिनिटे शिजवून घ्या.

  7. त्यानंतर एक पाणी टाका आणि कढईवर झाकण ठेवून पुन्हा ५ मिनिटं शिजवून घ्या.

  8. जेव्हा खिमा तेलापासून बाजूल होताना दिसेल तेव्हा मटर आणि शिजवलेली अंडी घाला.

  9. नंतर किमान ७ मिनिट हे शिजत असताना मधेमधे चमचा घालून मटर शिजले की नाहीत, पाहावे

  10. कढईतील ग्रेव्ही घट्ट होऊ लागेल तेव्हा गॅस बंद करा

  11. त्यात गरम मसाला, कोथिंबीर मिक्स करून घ्याला.

  12. शेवटी खमंग अंडा-खिमाकरी तयार होईल.

NOTES

  1. तयार झालेली गरमा-गरम अंडा-खिमाकरी तंदूर रोटी किंवा जिरा राईसबरोबर खाऊ शकता.

Back to top button