Stock Market Updates | RBI च्या निर्णयापूर्वी सेन्सेक्स ३५० अंकांनी घसरला, जाणून कोणते शेअर्स ॲक्शनमध्ये? | पुढारी

Stock Market Updates | RBI च्या निर्णयापूर्वी सेन्सेक्स ३५० अंकांनी घसरला, जाणून कोणते शेअर्स ॲक्शनमध्ये?

पुढारी ऑनलाईन : अमेरिकेतील महागाईची आकडेवारी आणि आरबीआयच्या उद्या जाहीर होणाऱ्या पतधोरणापूर्वी गुंतवणूकदारांनी सावध भूमिका घेतली आहे. परिणामी, आज बुधवारी सलग दुसऱ्या दिवशी सेन्सेक्स आणि निफ्टीत घसरण दिसून येत आहे. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स ३९४ अंकांनी घसरून ६५,५०० च्या खाली आला. तर निफ्टी ८४ अंकांनी घसरून १९,४८६ वर आला. दरम्यान, सेन्सेक्स ११ च्या सुमारास सुमारे ३५० अंकांच्या घसरणीसह ६५,५०० वर होता. (Stock Market Updates) बँकिंग, फायनान्सियल आणि आयटी स्टॉक्स घसरले आहेत.

सेन्सेक्सवर एम अँड एम, भारती एअरटेल, टेक महिंद्रा, टायटन हे शेअर्स वधारले. तर एचसीएल टेक, टीसीएस, आयटीसी, आयसीआयसीआय बँक, आयटीसी, एशियन पेंट्स, मारुती, ॲक्सिस बँक, हिंदुस्तान युनिलिव्हर, रिलायन्स हे शेअर्स घसरले. दरम्यान, जून तिमाहीत नफा किरकोळ वाढल्यानंतर ऑइल इंडियाचा शेअर (Oil India) ३ टक्क्यांनी घसरला.

अमेरिकेतील शेअर बाजारातील घसरणीच्या पार्श्वभूमीवर आशियाई बाजारात गुंतवणूकदारांची सावध भूमिका दिसून आली. जपानचा निक्केई निर्देशांक ०.४ टक्क्यांनी घसरला. हाँगकाँगचा हँगसेंग सुरुवातीला घसरला आणि त्यानंतर तो सावरून ०.२ टक्क्यांनी वाढला.

हे ही वाचा :

Back to top button