जगातील सर्वात मौल्यवान कंपनी Apple ला मोठा फटका! ३ ट्रिलियन डॉलरचा मुकूट गमावला | पुढारी

जगातील सर्वात मौल्यवान कंपनी Apple ला मोठा फटका! ३ ट्रिलियन डॉलरचा मुकूट गमावला

पुढारी ऑनलाईन : जगातील सर्वात मौल्यवान आयफोन निर्माता कंपनी ॲपल (Apple Inc.) चे बाजार भांडवल आता ऐतिहासिक ३ ट्रिलियन डॉलर पातळीच्या खाली आले आहे. विक्रीत घट झाल्याचा परिणाम कंपनीच्या बाजार भांडवलावर झाला असल्याचे Bloomberg ने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.

दरम्यान, शुक्रवारी ॲपलचे शेअर्स ४.८ टक्क्यांनी घसरले. ॲपल शेअर्ससाठी शुक्रवारचा दिवस २०२३ मधील आतापर्यंतचा सर्वात वाईट दिवस ठरला आणि गेल्या वर्षीच्या २९ सप्टेंबरनंतरचा हा सर्वात मोठा तोटा आहे. या वर्षी हा शेअर्स ४० टक्क्यांनी वाढला आहे.

Apple च्या कमाईने नफा आणि महसूल या दोन्ही बाबतीत अपेक्षापूर्ती केलेली नाही. iPhone, iPad आणि Mac विक्रीत घट झाल्यामुळे एकूण विक्री १ टक्के कमी झाली आहे. अॅपलचे घटलेले मूल्यांकन गुंतवणूकदारांसाठी चिंतेचा विषय बनला आहे.

ॲपलने सलग तिसऱ्या तिमाहीत विक्रीत घट नोंदवली आहे आणि सध्याही अशीच परिस्थिती राहणार असल्याचा अंदाज रिपोर्टमधून वर्तवला आहे. या पार्श्वभूमीवर कॅलिफोर्निया स्थित या कंपनीचे शेअर्स शुक्रवारी ४.८ टक्क्यांनी घसरले. परिणामी कंपनीचे बाजार भांडवल सुमारे २.८५ ट्रिलियन डॉलरवर आले. एका दिवसातील ही घसरण Apple ची सप्टेंबर नंतरची सर्वात मोठी बाजार भांडवलातील घसरण असून ती १६० अब्ज डॉलर पेक्षा जास्त आहे. जूनमध्ये Apple ही ३ ट्रिलियन डॉलर ($3 trillion) मूल्य असलेली जगातील पहिली कंपनी बनली होती. पण आती ती ३ ट्रिलियन डॉलरच्या खाली घसरली आहे.

दरम्यान,रोसेनब्लाट सिक्युरिटीजने ॲपल स्टॉकला न्यूट्ल पातळीवर डाउनग्रेड केले आहे. हा संमिश्र अहवाल “ॲपल आता ज्या मंदीच्या टप्प्यात आहे त्या स्थितीवर प्रकाश टाकतो.” कंपनीच्या सेवा व्यवसायात गती येत असली तरी, “अमेरिकेतील मंदीची स्थिती नवीन उत्पादन श्रेणी मजबूत पकड घेईपर्यंत टिकेल असे दिसते.” असे वृत्तात पुढे म्हटले आहे.

हे ही वाचा :

Back to top button