Apple new feature : आयफोनमध्‍ये आलं नवीन भन्‍नाट फीचर, फक्त १५ मिनिटात….

Apple new feature : आयफोनमध्‍ये आलं नवीन भन्‍नाट फीचर, फक्त १५ मिनिटात….
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क :  ॲपल आपल्या ग्राहकांसाठी नेहमी हटके असे फिचर आणतं असते. नुकतचं ॲपलने जाहीर केले आहे की, आपल्या ग्राहकांसाठी एक नव फिचर आणतं आहोत. हे फिचर या वर्षाच्या अखेरपर्यंत उपयोगात येईल. जाणून घेवूया या नवीन फिचरबाबत… (Apple new feature)

Apple new feature : फक्त १५ मिनिटांमध्‍ये हुबेहुब आवाज 

ॲपलने एक नवीन फीचर डिझाइन केले आहे. यामध्‍ये वापरकर्त्याच्या आवाजाचे हुबेहूब नक्कल करून तुमच्याशी बोलेल विशेषतः हे आयफोन (iPhone) आणि आयपॅड (iPad) मध्ये उपलब्ध असणार आहे. हे केवळ १५ मिनिटांत वापरकर्त्याच्या आवाजात बोलणे सुरू करते. अॅपलने असेही सांगितले की, हे ॲप वर्षाअखेर वापरकर्त्यांच्या सेवेत येईल.

अॅपलच्या मते,वापरकर्ते iPhone किंवा iPad वर 15 मिनिटांचा ऑडिओ रेकॉर्ड करण्यासाठी Randomize Set द्वारे वैयक्तिक आवाज तयार करू शकतात. ते मग तुमच्या आवाजात तंतोतंत बोलते. टीम ग्लीसन नानफा संस्थेचे बोर्ड सदस्य  फिलिप ग्रीन म्हणाले, मित्र आणि कुटुंबाशी बोलणे अत्यंत महत्त्वाचे आहे. अशा परिस्थितीत हे फीचर्स युजर्सना त्यांच्या आवाजात बोलण्यास मदत करतील.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news