heat stroke : सामना उष्माघाताचा | पुढारी

heat stroke : सामना उष्माघाताचा

सध्याच्या अघोरी उन्हाच्या दिवसांत पाण्याची टंचाई, वाढते तापमान, (heat stroke) असह्य उकाडा याबरोबरच उष्माघाताविषयीही चर्चा आहे. उष्माघात म्हणजे नेमके काय? उष्माघात (heat stroke) कोणाला होतो? उष्माघातापासून स्वत:ला कसे वाचवता येईल?

उष्माघात हा उष्णतेने होणारा सर्वात घातक प्रकार आहे. (heat stroke) जीवघेणी अवस्था असेही याचे वर्णन केले जाते. प्रखर तापमानाला सामोरे गेल्याने शरीरातील उष्णता-संतुलन व्यवस्था निकामी होते. वातावरणातील जास्त तापमान किंवा जोरदार गतिविधींमुळे शरीर ते सहन करू शकले नाही, तर उष्माघात होतो. जास्त तापमानामुळे शरीरातील महत्त्वाचे अवयव निकामी होण्याची शक्यता असते. उष्माघाताचे मुख्य लक्षण म्हणजे प्रमाणाबाहेर वाढलेले शारीरिक तापमान (104 डिग्रीपेक्षा जास्त), मानसिक बदल, भ्रम आणि कोमा. याखेरीज अन्य काही लक्षणेही दिसून येतात. उदाहरणार्थ- हृदयाची धडधड/ठोके वाढणे, भरभर आणि दीर्घ श्वास, रक्तदाब वाढणे किंवा कमी होणे, घाम थांबणे, चिडचिड, बेशुद्धी किंवा भ्रम, चंचलता येणे किंवा ठोके हलके होणे, डोकेदुखी, मळमळ (उलट्या) इत्यादी; पण उष्माघात गंभीर असेल, तर पुढील लक्षणे दिसून येतात- मानसिक भ्रम, हायपरव्हेंटिलेशन, शरीरात ताठरता, हात आणि पायांचे आखडणे, आक्रमकता, खोल बेशुद्धी इत्यादी. हे संकेत जीवघेणे ठरू शकतात. त्यामुळे त्याबाबतीत लगेचच उपचार केले जायला हवेत.

त्याद़ृष्टीने पुढील पद्धतीने प्रयत्न करून पाहता येतील. उष्माघात झालेल्या व्यक्तीला सर्वात आधी थंडाव्याच्या किंवा सावलीच्या ठिकाणी आणावे. व्यक्तीला खाली झोपवावे आणि त्याचे पाय व हात सरळ करावे. व्यक्तीचे कपडे सैल करावे आणि व्यक्तीला थंड पाणी पाजावे. व्यक्तीचे शरीर थंड पाण्याचे शिबके मारून किंवा थंड पाण्याच्या बोळ्याने पुसून काढून किंवा पंख्याच्या वार्‍याने थंड करावे. हे सर्व प्रथमोपचार करत असताना उष्माघातग्रस्त व्यक्तीवर बारकाईने लक्ष ठेवावे. ताप 102 फॅरनहाईटपेक्षा जास्त असेल, बेशुद्धी, भ—म किंवा आक्रमकता यासारखी लक्षणे दिसून येत असतील, तर ताबडतोब वैद्यकीय तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.

संबंधित बातम्या

आता तसे पाहता उष्माघात कोणालाही होऊ शकतो. त्यामुळे उष्माघातापासून स्वत:ला कसे वाचवता येते, हेदेखील आपण प्रत्येकाने समजून घेतले पाहिजे. उष्माघातापासून स्वत:ला वाचवण्यासाठी जास्तीत जास्त पेयपदार्थ घ्या. खासकरून नोकरी-व्यवसायासाठी घराबाहेर जात असाल, तर शरीरातील द्रव्याचे प्रमाण राखले जाईल आणि शरीर सर्वसाधारण तापमानावर राहील हे पाहा. सौम्य रंगाचे ढिले कपडे वापरा. अशा पद्धतीने जाणीवपूर्वक प्रयत्न केल्यास उष्माघातापासून स्वत:चे संरक्षण करणे अधिक सुकर होईल आणि तुमच्यासाठी हा उन्हाळाही सुसह्य ठरेल.

डॉ. संतोष काळे 

-हेही वाचा 

vegetables : ‘या’ भाज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात असतात प्रथिने 

School : जगातील सर्वात छोटी शाळा

Back to top button