प्रोटीन मिळवण्यासाठी आहारात डाळींचा समावेश करताय ? मग हे वाचाच | पुढारी

प्रोटीन मिळवण्यासाठी आहारात डाळींचा समावेश करताय ? मग हे वाचाच

पुढारी डिजीटल : शरीरबांधणीसाठी महत्त्वाचा घटक म्हणजे प्रोटीन असं आपण बरेचदा ऐकत असतो. अंडी, मांस, दूध हे पदार्थ प्रोटीनचे उत्तम सोर्स मानले जातात. पण मांस आणि अंडी न खाणाऱ्या शाकाहारी लोकांना मात्र प्रोटीनच्या सोर्ससाठी डाळींचाच आधार घ्यावा लागतो. पण डाळीतल प्रोटीन शरीरापर्यंत पोहोचतं का याचा विचार मात्र केला जातोच असं नाही.

• अशी आहे डाळींची उपयुक्तता :
प्रोटीनमध्ये 20 अमिनो अॅसिड असतात. त्यातील 9 हे प्राणीजन्य पदार्थापासून मिळतात. त्यामुळे आहारात दूध, चीज, पनीर, दही यांचा आवर्जून समावेश करण्याबाबत आहारतज्ञ सांगत असतात. अनेकजण प्राणीजन्य पदार्थ टाळतात. किंवा वेगन असतात. अशा लोकांनी वनस्पतीजन्य प्रोटीनचा समावेश आहारात जरूर करावा. 100 ग्रॅम डाळीत 20 ग्रॅम कार्बज असतात. डाळीचं सेवन केल्याने अनेकदा पोट भरल्याची भावना निर्माण होते.

त्यामुळे डाएट करताना अनेकजण डाळींच्या सेवनाला प्राधान्य देतात. एका प्रौढ व्यक्तीला दिवासाकाठी 0.8 ग्रॅम पर किलो प्रोटीनची गरज असते. 100 ग्रॅम डाळीत जवळपास 24 ग्रॅम प्रोटीन असते. त्यामुळे चौकोनी कुटुंबात 100 ग्रॅम डाळ बनत असेल तर एका व्यक्तीच्या वाट्याला केवळ 2-3 ग्रॅम डाळ येते. रोजच्या प्रोटीनच्या गरजेच्या मानाने हे प्रमाण अगदीच नगण्य आहे. त्यामुळे अनेकदा प्राणीजन्य प्रोटीन सोर्स वापरण्याचा सल्ला दिला जातो.

• पर्याय ठेवा :
रोज त्याच त्याच प्रकारची डाळ खाऊन अनेकांना कंटाळा येतो. त्यामुळे डाळीत पालेभाज्या किंवा इतर फळभाज्या घालाव्यात. याशिवाय आमटी, खिचडी, सूप, सार, पुलाव यामध्ये डाळींचा वापर करून तो अधिक पौष्टिक बनवू शकता.

• असं ठेवा प्रमाण :
चार वाट्या पाणी आणि एक वाटी डाळ यातून पुरेसे प्रमाणात प्रोटीन मिळतेच असं नाही. त्यामुळे डाळींचा वापर करताना पाण्याचं प्रमाण योग्य राहील यांची खात्री करा.

• पॉलिश डाळींचा वापर टाळा :

डाळी निवडताना त्या अनपॉलिश असतील याची खात्री करा. जेणेकरून शिजवल्यावर त्यातील सत्व कमी होणार नाही.

Back to top button