गणेश उत्‍सव २०२३ : श्री दशावताराची आरती | पुढारी

गणेश उत्‍सव २०२३ : श्री दशावताराची आरती

गणेश उत्‍सव २०२३ : गणेश चतुर्थीच्या मुहुर्तावर श्री गणेशाची स्थापनेने गणेश उत्सव 2023 चा प्रारंभ झाला आहे. ढोल-ताशांच्या गजरात वाजत-गाजत मिरवणूक काढत गणपत्ती बाप्पा मोरयाच्या जय घोषात श्री गणेशाची घरोघरी आणि सार्वजनिक मंडळांमध्ये स्थापना करण्यात आली.  श्री गणेश हे विघ्नहर्ता आहेत. त्यांच्या स्थापनेने मंगलमय वातावरण निर्माण झाले आहे. तसेच नवचैतन्य निर्माण झाले आहे. सर्वत्र गणेश उत्सव 2023 चा आनंदोत्सव साजरा केला जात आहे. विघ्नहर्ता बाप्पा सर्वांच्या आयुष्यातील विघ्न दूर करो, हीच प्रार्थना आहे. श्री गणेशाच्या आरतीने गणेश पूजन केले जाते. तसेच गणपतीच्या आरतीसह श्री दशावताराची आरती ही गणेश चतुर्थी उत्‍सव काळातील पुजेत म्‍हटली जाते.

गणेश उत्‍सव २०२३ : श्री दशावताराची आरती

आरती सप्रेम जय जय विठ्ठल परमब्रम्ह ॥
भक्तसंकटी नाना स्वरूपे स्थापिसि स्वधर्म ॥ धृ.॥

अंबऋषीकारणें गर्भवास सोशीसी ॥
वेद नेले चोरूनि ब्रह्म्या आणुनियां देसी ॥
मत्स्यरूपी नारायण सप्तहि सागर धुंडीसी ॥
हस्त तुझा लागतां शंखासुरा वर देशी ॥1॥

आरती सप्रेम जय जय विठ्ठल परमब्रम्ह ॥
भक्तसंकटी नाना स्वरूपे स्थापिसि स्वधर्म ॥ धृ.॥

रसातळाशी जाता पृथ्वी पाठीवरी घेसी ॥
परोपकारासाठी देवा कांसव झालासी ॥
दाढें धरूनी पृथ्वी नेतां वराहरूप होसी ॥
प्रल्हादाकारणें नरहरि स्तंभी गुरगुरसी ॥2॥

आरती सप्रेम जय जय विठ्ठल परमब्रम्ह ॥
भक्तसंकटी नाना स्वरूपे स्थापिसि स्वधर्म ॥ धृ.॥

पांचवे अवतारी बळिच्या द्वाराला जाशी ॥
भिक्षे स्थळ मागुनी बळीला पाताळा नेसी॥
सर्व समर्पण केलें म्हणवूनी प्रसन्न त्या होसी ॥
वामनरूप धरूनी बळीच्या द्वारीं तिष्ठसी ॥3॥

आरती सप्रेम जय जय विठ्ठल परमब्रम्ह ॥
भक्तसंकटी नाना स्वरूपे स्थापिसि स्वधर्म ॥ धृ.॥

सहस्त्रार्जून मातला ॥ जमदग्नीचा वध केला॥
कष्टी ते रेणुका म्हणूनी सहस्त्रार्जुन वधिला॥
नि:क्षत्री पृथ्वी दान दिधली विप्राला ॥
सहावा अवतार परशुराम प्रगटला ॥4॥

आरती सप्रेम जय जय विठ्ठल परमब्रम्ह ॥
भक्तसंकटी नाना स्वरूपे स्थापिसि स्वधर्म ॥ धृ.॥

मातला रावण सर्वा उप्रदव केला ॥
तेहतीस कोटी देव बंदी हरिलें सीतेला ॥
पितृवचनालागीं रामें वनवास केला ॥
मिळवूनी वानरसेना राजा राम प्रगटला ॥5॥

आरती सप्रेम जय जय विठ्ठल परमब्रम्ह ॥
भक्तसंकटी नाना स्वरूपे स्थापिसि स्वधर्म ॥ धृ.॥

देवकी वसुदेव बंदीमोचन त्वां केलें॥
नंदाघरी जाऊनि निजसुख गोकुळा दिधलें ॥
गोरसचोरी करिता नवलक्ष गोपाळ मिळविले ॥
गोपिकांचे प्रेम देखुनी श्रीकृष्ण भुलले ॥ 6॥

आरती सप्रेम जय जय विठ्ठल परमब्रम्ह ॥
भक्तसंकटी नाना स्वरूपे स्थापिसि स्वधर्म ॥ धृ.॥

बौद्ध कलंकी कलियुगी अधर्म हा अवघा॥
सांडुनि दिधला धर्म म्हणोनी न दिससी देवा
म्लेंच्छमर्दन करिसी म्हणोनि कलंकी केशवा ॥
बहिरवी जान्हवी द्यावी निजसुखानंदसेवा ॥7॥

आरती सप्रेम जय जय विठ्ठल परमब्रम्ह ॥
भक्तसंकटी नाना स्वरूपे स्थापिसि स्वधर्म ॥ धृ.॥

हेही वाचलंत का?

Back to top button