LPG eKYC Rule: सरसकट सर्व गॅसधारकांना ईकेवायसी बंधनकारक आहे का? सरकारचं स्पष्टीकरण

LPG eKYC Rules Explained: LPG eKYC संदर्भात पसरलेल्या गैरसमजांवर सरकारने स्पष्टता दिली आहे. ही प्रक्रिया सर्व ग्राहकांसाठी बंधनकारक नसून फक्त अपूर्ण eKYC असलेल्या ग्राहकांसाठी लागू आहे.
LPG eKYC Rules Explained
LPG eKYC Rules ExplainedPudhari
Published on
Updated on

LPG eKYC Rules Explained: एलपीजी (LPG) गॅस ग्राहकांसाठी आधार बायोमेट्रिक eKYC अनिवार्य करण्यात आल्याच्या बातम्या सध्या सोशल मीडियावर आणि काही माध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणावर फिरत आहेत. मात्र, केंद्र सरकारने या संदर्भात स्पष्टीकरण दिले असून सर्व ग्राहकांसाठी eKYC बंधनकारक नसल्याचे सांगितले आहे. सरकारने सांगितले की, ही कोणतीही नवीन सूचना नसून आधीपासूनच सुरू असलेल्या प्रक्रियेचा भाग आहे. यामागचा उद्देश अधिकाधिक ग्राहकांनी eKYC पूर्ण करावी हा आहे.

eKYC कोणाला बंधनकारक?

सरकारच्या माहितीनुसार, eKYC ही अट केवळ त्या LPG ग्राहकांसाठी लागू आहे ज्यांनी अद्याप eKYC पूर्ण केलेले नाही. ज्या ग्राहकांनी आधीच eKYC केली आहे, त्यांना पुन्हा प्रक्रिया करण्याची आवश्यकता नाही.

LPG eKYC Rules Explained
LPG Crisis: गॅस मिळत नसल्याने व्यवसाय ठप्प; छोटे हॉटेल्स बंद, हजारो कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात

PMUY ग्राहकांसाठी काय नियम?

प्रधानमंत्री उज्ज्वला योजना (PMUY) अंतर्गत येणाऱ्या ग्राहकांसाठी eKYC आर्थिक वर्षात फक्त एकदाच करणे आवश्यक आहे. तेही फक्त DBT (Direct Benefit Transfer) अनुदान मिळवण्यासाठी, विशेषतः 7 सिलेंडरनंतर 8वा आणि 9वा सिलेंडर घेताना हा नियम लागू होतो.

घरबसल्या मोफत eKYC सुविधा

सरकारने स्पष्ट केले की, eKYC प्रक्रिया अत्यंत सोपी असून ती घरबसल्या मोफत करता येते. त्यामुळे ग्राहकांना कोणतीही अतिरिक्त फी देण्याची गरज नाही. या प्रक्रियेमुळे गॅस सिलेंडरच्या पुरवठ्यावर कोणताही परिणाम होणार नाही, असेही सरकारने स्पष्ट केले आहे. म्हणजेच, eKYC न केल्यास तातडीने गॅस मिळणे बंद होणार नाही.

LPG eKYC Rules Explained
Q Commerce: 200 रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या सामानाची फ्रि डिलिव्हरी नाहीच; Q Commerce कंपन्यांचा ग्राहकांना झटका

eKYC का आवश्यक?

सरकारच्या मते, eKYC मुळे पारदर्शकता वाढते, योग्य लाभार्थी ओळखणे सोपे होते आणि बनावट किंवा डुप्लिकेट ग्राहकांना आळा बसतो. तसेच LPG चा गैरवापर आणि काळाबाजारही रोखता येतो.

LPG eKYC संदर्भात पसरत असलेल्या गैरसमजांना पूर्णविराम देत सरकारने स्पष्ट केले की, सर्व ग्राहकांसाठी ही प्रक्रिया बंधनकारक नाही. मात्र, ज्यांनी अद्याप eKYC केलेली नाही त्यांनी ती पूर्ण करणे आवश्यक आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news