Tobacco–Diabetes Link | व्यसन वडिलांचे, शिक्षा मुलांना..! जाणून घ्या तंबाखू आणि मुलांमधील मधुमेहाचा काय आहे संबंध?

Tobacco–Diabetes Link | तंबाखूचे व्‍यसन पालकांसाठीच नाही, तर भावीपिढीसाठीही तितकेच घातक
Tobacco–Diabetes Link
प्रतीकात्मक छायाचित्र. AI-generated image.
Published on
Updated on

Tobacco–Diabetes Lik

वॉशिंग्‍टन : वडिलांना तंबाखू किंवा निकोटीनचे व्यसन असेल, तर त्याचा थेट परिणाम त्यांच्या मुलांच्या आरोग्यावर होऊ शकतो. अशा मुलांच्या शरीरात साखर पचवण्याची शक्ती कमी होते, ज्यामुळे त्यांना भविष्यात मधुमेह (Diabetes) होण्याचा मोठा धोका असतो, असे एका नवीन संशोधनात स्पष्ट झाले आहे.

तंबाखूचे व्यसन भावी पिढीसाठी घातक

'जर्नल ऑफ द एंडोक्राइन सोसायटी'मध्ये प्रसिद्ध झालेल्या संशोधनानुसार, तंबाखूचे सेवन केवळ पालकांसाठीच नाही, तर त्यांच्या येणाऱ्या पिढीसाठीही तितकेच घातक ठरू शकते.या अभ्यासाचे स्टेफनी अगुइयार, ट्रुमन नॅटिव्हिडॅड, डॅनियल डेव्हिस आणि कार्लोस डियाझ-कॅस्टिलो हे लेखक आहेत.

Tobacco–Diabetes Link
Obesity Health Alert | सावधान! लठ्ठपणा केवळ 'लाईफस्टाईल' नाही, तर एक 'जुनाट आजार'! डायबेटीजतज्ज्ञ कोणते धोके सांगतात?

संशोधनात काय आढळले?

उंदरांवर केलेल्या एका अभ्यासात असे आढळून आले आहे की, वडिलांच्या निकोटीनच्या संपर्कामुळे त्यांच्या संततीच्या साखर पचवण्याच्या क्षमतेवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे मधुमेहाचा धोका वाढू शकतो. यू.एस. सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशननुसार, अमेरिकेत अंदाजे ४.०१ कोटी लोकांना मधुमेह आहे. मधुमेहामुळे लोकांना हृदयरोग, मूत्रपिंडाचे आजार आणि मज्जातंतूंचे नुकसान यांसारखे इतर गंभीर आजार होण्याचा धोका असतो. मधुमेह हा १२ टक्क्यांहून अधिक अमेरिकन लोकांना होत असल्यामुळे आणि तो एक दीर्घकालीन आजार असल्यामुळे, त्याच्या उपचारांचा खर्चही जास्त आहे.

Tobacco–Diabetes Link
International Women’s Day | भात आणि लठ्ठपणा; आधुनिक जीवनशैलीत भारतीय महिलांनी आरोग्याचा समतोल कसा साधावा?

... तर मधुमेहपासून बचाव करणे अधिक सोपे

तंबाखूचे सेवन हे आजारांना निमंत्रण देणारे आहे. आपण सिगारेट, विडी आणि ई-सिगारेट यांसारख्या व्यसनांना आळा घातला, तर मधुमेहाचा (Diabetes) वाढता धोका कमी करता येईल. विशेषतः पुरुषांमध्ये तंबाखूचे प्रमाण स्त्रियांपेक्षा जास्त असल्याने, त्यांनी ही सवय सोडल्यास मधुमेहाच्या संकटापासून स्वतःचा बचाव करणे अधिक सोपे होईल," असेही नवीन संशोधनात स्पष्ट करण्यात आले आहे.

Tobacco–Diabetes Link
Obesity Alert | सावधान! 'या'सवयींमुळे वाढतो लठ्ठपणा; आजच व्हा सावध

पुरुषांच्या तंबाखू सेवनाचा थेट परिणाम त्यांच्या मुलांच्या आरोग्यावर

संशोधकांनी निकोटीन घेणाऱ्या उंदरांच्या पिल्लांची तुलना निकोटीन न घेणाऱ्या उंदरांच्या पिल्लांशी केली. ज्या उंदरांच्या वडिलांनी निकोटीन घेतले होते, त्यांच्या मादी पिल्लांमध्ये इन्सुलिन आणि साखरेचे (ग्लुकोज) प्रमाण असामान्यपणे कमी आढळले. नर पिल्लांमध्ये रक्तातील साखर कमी दिसली आणि त्यांच्या यकृताच्या (Liver) कामातही बदल जाणवले. शरीरातील हा बिघाड पुढे जाऊन लठ्ठपणा, मधुमेह आणि यकृताच्या गंभीर आजारांना (उदा. फॅटी लिव्हर) निमंत्रण देऊ शकतो.

Tobacco–Diabetes Link
Hereditary diabetes risk | मधुमेहाची आनुवंशिकता समजून घेताना...

मुलांमध्ये दीर्घकालीन आजार होण्याची शक्यता

"पुरुषांच्या संपर्कामुळे त्यांच्या मुलांमध्ये दीर्घकालीन आजार होण्याची शक्यता वाढू शकते, हे पुरावे लक्षात घेता, गर्भधारणेपूर्वीच्या काळजीमध्ये पुरुषांच्या आरोग्याचा समावेश करणे अत्यंत महत्त्वाचे आहे," असे संशोधकांनी स्‍पष्‍ट केले आहे . "आमच्या निष्कर्षांनुसार, वडिलांच्या तंबाखूजन्य पदार्थांच्या वापरामुळे त्यांच्या मुलांच्या आरोग्यावर दीर्घकाळ टिकणारे परिणाम होऊ शकतात." प्रयोगात उंदरांना शुद्ध निकोटीनच्या संपर्कात आणले गेल्यामुळे, सिगारेटमधील उप-उत्पादने किंवा ई-सिगारेटमधील अतिरिक्त घटक चयापचय बदलांसाठी जबाबदार नव्हते, असे निष्कर्ष सूचित करतात, असे चामारो-गार्सिया यांनी नमूद केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news