Gold Price Today: सोनं 3,000 रुपयांनी झालं स्वस्त; चांदीतही मोठी घसरण, गुंतवणुकीसाठी ही योग्य वेळ आहे का?

Gold Price Today: जागतिक तणावाच्या पार्श्वभूमीवरही सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये मोठी घसरण झाली आहे. सोने प्रति 10 ग्रॅम जवळपास 3000 रुपयांनी स्वस्त झाले, तर चांदीतही मोठी घसरण झाली.
Gold Price Today
Gold Price TodayPudhari
Published on
Updated on

Gold Price Today: जागतिक पातळीवर अनिश्चितता आणि युद्धसदृश परिस्थिती निर्माण झाल्यास सोने आणि चांदीसारख्या मौल्यवान धातूंच्या किमती साधारणपणे वाढताना दिसतात. मात्र अलीकडे घडलेल्या एका घडामोडीने गुंतवणूकदारांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये मोठी घसरण झाली.

सोन्याच्या किमतीत प्रति 10 ग्रॅम जवळपास 2690 ते 2900 रुपयांपर्यंत घसरण झाली. एमसीएक्सवर सोने सुमारे 1.83 टक्क्यांनी घसरून 1,55,566 रुपयांवर व्यवहार करताना दिसले.

चांदीच्या किमतीत तर आणखी मोठी घसरण झाली. प्रति किलो चांदी 4232 ते 5000 रुपयांपर्यंत स्वस्त झाली. दिवसभरात चांदी जवळपास 2.11 टक्क्यांनी घसरून 2.53 ते 2.55 लाख रुपये प्रति किलो या दरम्यान व्यवहार करत होती.

Gold Price Today
LPG Shortage: LPG टंचाईचा फटका फूड डिलिव्हरी क्षेत्राला; Swiggy-Zomato ऑर्डरमध्ये मोठी घट, गिग वर्कर्सची कमाई थांबली

युद्ध काळात सोनं स्वस्त

सामान्यतः भू-राजकीय तणाव वाढला की गुंतवणूकदार सुरक्षित पर्याय म्हणून सोने खरेदी करतात, त्यामुळे त्याच्या किमती वाढतात. मात्र सध्या अमेरिका आणि इराणमधील तणावाच्या पार्श्वभूमीवरही सोने स्वस्त झाले आहे.

तज्ज्ञांच्या मते, यामागे मुख्य कारण म्हणजे कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली वाढ. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत 100 डॉलर प्रति बॅरलच्या पुढे गेली आहे. तेल महागल्याने जागतिक स्तरावर महागाई वाढण्याची शक्यता निर्माण होते.

महागाई आणि व्याजदरांचा परिणाम

महागाई वाढू लागली की ती नियंत्रित करण्यासाठी अमेरिकेची केंद्रीय बँक – फेडरल रिझर्व्ह व्याजदर वाढवते. व्याजदर जास्त असतील तर बाजारात पैशांचा पुरवठा कमी होतो. त्यामुळे गुंतवणूकदार सोने खरेदी करण्याऐवजी इतर गुंतवणूक पर्यायांकडे वळतात.

याशिवाय व्याजदर वाढले की अमेरिकी डॉलर मजबूत होतो. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची डॉलरमध्ये खरेदी-विक्री होते. डॉलर मजबूत झाल्यास सोने महाग वाटू लागते आणि त्याची मागणी कमी होते. यामुळे सोन्याच्या किमती घसरतात.

Gold Price Today
Fertilizer Imports: शेतकरी संकटात? मिडल ईस्ट तणावामुळे खत पुरवठ्यावर परिणाम; सरकारने घेतला मोठा निर्णय

गुंतवणूकदारांनी काय करावे?

बाजारातील तज्ज्ञांच्या मते अशा चढ-उताराच्या काळात गुंतवणूकदारांनी घाबरून निर्णय घेऊ नये. कमोडिटी बाजारात अल्पकालीन घसरण सामान्य असते. दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी मात्र ही घसरण खरेदीची संधी ठरू शकते. काही विश्लेषकांच्या मते, या वर्षी दिवाळीपर्यंत सोने पुन्हा विक्रमी उच्चांक गाठू शकते.

तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, गुंतवणूक करताना संपूर्ण रक्कम एकाच वेळी गुंतवू नये. उदाहरणार्थ, 1 लाख रुपयांची गुंतवणूक करायची असल्यास टप्प्याटप्प्याने गुंतवणूक करणे अधिक योग्य आहे. तसेच कच्च्या तेलाच्या किमती, महागाईचा कल आणि अमेरिकन फेडरल रिझर्व्हचे व्याजदर यावर लक्ष ठेवणे आवश्यक आहे, कारण या घटकांचा सोन्या-चांदीच्या किमतींवर मोठा परिणाम होतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news