बेळगाव : प्रजासत्ताक दिनी राष्ट्रीय शालेय बँड स्पर्धेसाठी बेंगळूरच्या २७ मुली दिल्लीला रवाना | पुढारी

बेळगाव : प्रजासत्ताक दिनी राष्ट्रीय शालेय बँड स्पर्धेसाठी बेंगळूरच्या २७ मुली दिल्लीला रवाना

बेळगाव; पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रीय स्तरावरील शालेय बँड स्पर्धा 21-22 जानेवारीरोजी दिल्ली येथे होणार आहे. यासाठी PM SHRI KV MEG & Centre, बेंगळूर येथील 27 मुली चमकदार कामगिरी दाखवण्यासाठी सज्ज आहेत. शिक्षकांच्या देखरेखीखालील युवा संघ बुधवारी (दि.17)  राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत सहभागी होण्यासाठी रवाना झाला. ४ महिन्यांचा कठोर व नियमित सराव, मुलींची जिद्द, शाळेचे मुख्याध्यापक लोकेश शर्मा, शिक्षक आणि आर्मी एमईजी सेंटरचे सतत मार्गदर्शन यामुळे राष्ट्रीय स्तरावरील शालेय बँड स्पर्धेपर्यंत मुलींनी बाजी मारली आहे.

नॅशनल स्टेडियम, नवी दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील बँड स्पर्धेत एकूण १६ बँड संघ सहभागी होणार आहेत. राष्ट्रीय स्तरावर, प्रत्येक गटातील विजेत्या संघांना रोख पारितोषिक, ट्रॉफी, तसेच प्रमाणपत्रे दिली जाणार आहेत.

मुलींचा संघ नोव्हेंबर 2023 मध्ये मंड्या येथे झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत आणि पुन्हा डिसेंबर 2023 मध्ये तिरुअनंतपुरम येथे झालेल्या विभागीय स्तरावरील स्पर्धेत प्रथम आला. विभागीय स्पर्धेदरम्यान संघाला “सर्वोत्कृष्ट टीम वर्क” ट्रॉफी देखील देण्यात आली. संरक्षण मंत्रालयाच्या सहकार्याने शिक्षण मंत्रालयाने प्रजासत्ताक दिन 2024 साठी अखिल भारतीय स्तरावर राष्ट्रीय शालेय बँड स्पर्धा आयोजित केली आहे. 2017 पासून ही स्पर्धा सुरू झाल्यापासून दरवर्षी शेकडो शाळांनी यात भाग घेतला आहे. स्पर्धा तीन स्तरांवर आयोजित केली जाते. यामध्ये राज्य/केंद्रशासित प्रदेश, क्षेत्रीय आणि राष्ट्रीय असे स्तर आहेत.

राज्य आणि विभागीय स्तरावरील स्पर्धांचा समारोप झाला आहे. राष्ट्रीय स्तरावरील (अंतिम) स्पर्धा 21 आणि 22 जानेवारी 2024 रोजी नवी दिल्ली येथील राष्ट्रीय स्टेडियम येथे होणार आहे. विभागीय स्तरावर सहभागी झालेल्या 73 शाळांपैकी प्रत्येकी चार संघ पात्र ठरले आहेत. झोन (ईस्टर्न झोन, वेस्टर्न झोन, सदर्न झोन, नॉर्दर्न झोन)

हेही वाचा :

Back to top button