Prajwal Revanna Scandal case | ३ हजार सेक्स व्हिडिओज अन् ब्लॅकमेल?; माजी पंतप्रधानांचा नातू अडचणीत, कर्नाटकात खळबळ | पुढारी

Prajwal Revanna Scandal case | ३ हजार सेक्स व्हिडिओज अन् ब्लॅकमेल?; माजी पंतप्रधानांचा नातू अडचणीत, कर्नाटकात खळबळ

पुढारी ऑनलाईन डेस्क : कर्नाटकातील एका भाजप नेत्याच्या दाव्याने खळबळ उडाली आहे. मला सरकारी अधिकाऱ्यांसह महिलांचे सुमारे ३ हजार व्हिडिओ असलेले पेन ड्राइव्ह मिळाले असल्याचा दावा त्यांनी केला आहे. याबाबत त्यांनी डिसेंबर २०२३ मध्ये राज्याच्या पक्षाध्यक्षांना पत्र लिहिले होते. त्यात त्यांनी माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा (former Prime Minister and JD(S) supremo HD Deve Gowda) यांचे नातू तसेच कर्नाटकातील हसन लोकसभा खासदार आणि जेडीएसचे (जनता दल सेक्युलर) उमेदवार प्रज्ज्वल रेवन्ना यांच्याविरोधात लैंगिक छळाचा गंभीर आरोप केला होता. या फुटेजचा वापर महिलांना ब्लॅकमेल करून त्यांना सतत लैंगिक कृत्यांमध्ये गुंतण्यासाठी केला असल्याचाही आरोप रेवन्ना यांच्यावर करण्यात आला आहे. (Prajwal Revanna Scandal case) याबाबत सविस्तर वृत्त ‘इंडिया टुडे‘ने दिले आहे.

दरम्यान, या प्रकरणाच्या चौकशीसाठी कर्नाटक सरकारने विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी तसे आदेशही जारी केले आहेत.

प्रज्ज्वल यांचे महिलांसह आक्षेपार्ह स्थितीतील व्हिडीओ व्हायरल झाले. महिलांवर दबाव आणून त्यांचा लैंगिक छळ करण्यात आल्याचा सूर उमटला. पीडितांमध्ये काही शासकीय कर्मचारी असल्याचेही सांगण्यात येते. यानंतर कर्नाटक राज्य महिला आयोगाने २६ एप्रिल रोजी या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली होती. विशेष तपास पथक नेमावे, असेही राज्य सरकारला सुचविले होते. मुख्यमंत्र्यांनी सोशल मीडियावरून या प्रकरणावर भाष्यही केलेले आहे. दुसरीकडे प्रज्वल रेवन्ना शनिवारी सकाळीच जर्मनीला रवाना झाले आहेत. प्रज्ज्वल हे २०१९ मध्ये निवडून आलेले सर्वांत कमी वयाचे (२९) खासदार ठरले होते.

कर्नाटकातील लोकसभा निवडणुकीच्या दोन दिवस आधीच हे व्हिडीओ व्हायरल झालेले आहेत. निवडणुकांवर प्रभाव टाकण्याचा हेतू यामागे आहे, असे पूर्णचंद्र तेजस्वी एम. जी. यांनी याप्रकरणी पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे.

३३ वर्षीय जेडीएस खासदार रेवन्ना हे हसन लोकसभा मतदारसंघाचे एनडीएचे उमेदवार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात येथे २६ एप्रिल रोजी मतदान झाले होते. जेडीएस पक्ष सप्टेंबर २०२३ मध्ये NDA मध्ये सामील झाला होता.

पेन ड्राइव्हमध्ये २,९७६ व्हिडिओज

८ डिसेंबर २०२३ रोजी भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांना लिहिलेल्या पत्रात, २०२३ च्या विधानसभा निवडणुकीत पक्षाचे होलेनर्सीपुराचे उमेदवार देवराजे गौडा म्हणाले होते, “प्रज्वल रेवन्ना यांच्यासह एच.डी. देवेगौडा कुटुंबातील अनेक नेत्यांवर गंभीर आरोप आहेत.” पेन ड्राइव्हमध्ये एकूण २,९७६ व्हिडिओ आहेत आणि फुटेजमध्ये दिसलेल्या काही महिला सरकारी अधिकारी होत्या, असेही देवराजे गौडा म्हणाले होते. या व्हिडिओचा वापर त्यांना लैंगिक कृत्यांमध्ये सतत गुंतवून ठेवून ब्लॅकमेल करण्यासाठी केला जात होता”, असेही दावा त्यांनी केला होता. (Prajwal Revanna Scandal case)

भाजप नेत्याने पुढे असाही दावा केला की हे व्हिडिओ आणि फोटो असलेला आणखी एक पेन ड्राइव्ह काँग्रेसच्या राष्ट्रीय नेत्यांपर्यंत पोहोचला आहे.

प्रज्वल रेवन्ना यांना पक्षातून हटवा, देवेगौडांना पत्र

दरम्यान, रविवारी जेडीएस आमदार शरणागौडा कंदकूर यांनी पक्षप्रमुख एच. डी. देवेगौडा यांना पत्र लिहून प्रज्वल रेवन्ना यांना पक्षातून हटवण्याची विनंती केली. कारण या प्रकरणामुळे पक्षासमोर अडचणी निर्माण होऊ शकतात. “गेल्या काही दिवसांपासून आक्षेपार्ह व्हिडिओ राज्यभर व्हायरल होत आहेत. या व्हिडिओत प्रज्वल रेवन्ना दिसत आहे. त्यामु‍ळे मी तुम्हाला विनंती करतो की त्यांना ताबडतोब पक्षातून हटवावे,” असे कंदकूर यांनी पुढे म्हटले आहे.

….तरीही भाजपची जेडीएस सोबत युती : लक्ष्मी हेब्बाळकर

प्रज्वल रेवन्ना यांचा समावेश असलेल्या ‘अश्लील व्हिडिओ’ प्रकरणावर बोलताना कर्नाटकच्या महिला आणि बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी म्हटले, “अशा घटना आपल्या देशात आणि जगात कधीच घडलेली नाही. प्रज्वल रेवन्ना हे हसनचे जेडीएसचे खासदार आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, कर्नाटक भाजपचे प्रमुख बी. वाय. विजयेंद्र यांना अशा सीडी आणि व्हिडिओंची माहिती होती. कारण भाजप नेते देवराज गौडा यांनी विजयेंद्र यांना पत्र लिहिले होते आणि ते याबाबत बोललेही होते. जेव्हा अमित शहा म्हैसूरला आले तेव्हा भाजप नेते प्रीतम गौडा आणि ए.टी. रामास्वामी यांनी जेडीएस सोबत युती न करण्यावर जोर दिला होता. असे असूनही भाजपने जेडीएस सोबत युती केली.”

या प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी एसआयटी स्थापन केली आहे. आता मला या प्रकरणी भाजपची भूमिका काय आहे? हे जाणून घ्यायचे आहे. राष्ट्रीय महिला आयोगाच्या प्रमुख रेखा शर्मा कुठे आहेत?. जे. पी. नड्डा कुठे आहेत, ते काहीच का बोलत नाहीत?. यानंतर भाजप जेडीएस सोबत युती कायम ठेवेल की नाही? हे आता मला पाहायचे आहे, असे सवल लक्ष्मी हेब्बाळकर यांनी उपस्थित केले आहेत.

 हे ही वाचा :

Back to top button