बेळगाव: कृष्णा जाधव यांचे मरणोत्तर नेत्रदान | पुढारी

बेळगाव: कृष्णा जाधव यांचे मरणोत्तर नेत्रदान

बेळगाव: पुढारी वृत्तसेवा: रघुनाथ पेठ अनगोळ येथील शासकीय ठेकेदार कृष्णा महादेव जाधव यांचे वयाच्या ८७ व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यानंतर त्यांचे नेत्रदान करण्यात आले.

सामाजिक कार्यकर्ते प्रदीप चव्हाण यांनी त्यांच्या कुटुंबियांना नेत्रदानाविषयी माहिती दिली. त्यानंतर जायंट्स आय फौंडेशनच्या माध्यमातून केएलई नेत्रपेढीच्या डॉ. रितिका आणि डॉ. उमंग भडाणी यांच्या सहकार्याने नेत्रदानाची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.
कृष्णा जाधव यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, तीन मुली व नातवंडे असा परिवार आहे.

हेही वाचा 

Back to top button