बेळगाव : विधानसभेत 20 पाटील झाले आमदार | पुढारी

बेळगाव : विधानसभेत 20 पाटील झाले आमदार

बेळगाव; पुढारी वृत्तसेवा :  एकेकाळी गावचा गावगाडा पाटील चालवत असतं. परंतु, काळाच्या ओघात गावगाड्यातून पाटील पद कमी झाले. परंतु, राजकारणात पाटील आडनावाचा तोच दरारा आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत 20 पाटील आमदार झाले आहेत. यामध्ये बेळगावचे अभय पाटील व बाबासाहेब पाटील यांचा समावेश आहे.

विधानसभेच्या निवडणुकीत तब्बल 87 पाटलांनी उमेदवारी अर्ज दाखल करून निवडणूक लढवली. त्यापैकी 20 जणांना यश मिळाले. परिणामी, कर्नाटकच्या विधानसभेत 20 पाटील दिसून येणार आहेत. कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा राज्यात पाटील आडनावाला फार मोठे राजकीय वलय लाभले आहे. गावची धुरा त्यांच्याकडे असते. लोकशाहीमुळे इतर समाजालाही फार मोठ्या प्रमाणात राजकारणात संधी मिळत आहे. परंतु अशातही पाटील आडनावाचा दरारा कायम आहे. महाराष्ट्र आणि मराठी भागात पाटील म्हणून ओळखण्यात येणार्‍यांना कन्नड भागात गौड म्हणून ओळखले जाते.

महाराष्ट्र, गोवा आणि मराठी भागात पाटील हे मराठा समाजातील असतात. परंतु कर्नाटकात लिंगायत, जैन, धनगर, ब्राम्हण समाजात पाटील हे आडनाव आढळते. यावेळच्या निवडणुकीत 20 पाटील निवडून आले आहेत. यापूर्वी कर्नाटकच्या विधानसभेत म. ए. समितीचे दिवंगत बी. आय. पाटील, संभाजी पाटील, माजी आमदार दिगंबर पाटील, अरविंद पाटील, त्याचबरोबर श्रीमंत पाटील, काकासाहेब पाटील या मराठा पाटलांनी प्रतिनिधीत्व केले आहे. यावेळी मराठा पाटील सभागृहात नाहीत.

निवडून आलेले पाटील आडनावाचे आमदार

आमदार पक्ष                  मतदारसंघ
अभय पाटील                भाजप बेळगाव दक्षिण
बाबासाहेब पाटील           काँग्रेस कित्तूर
जे. टी. पाटील                  काँग्रेस बिळगी
बी. बी. पाटील               निजद देवरहिप्परगी
शिवानंद पाटील          काँग्रेस बसवण बागेवाडी
एम बी. पाटील                 काँग्रेस बबलेश्वर
बसनगौडा पाटील           भाजप विजापूर शहर
यशवंतगौडा पाटील               काँग्रेस इंडी
एम. वाय. पाटील              काँग्रेस अफझलपूर
चन्नरेड्डी पाटील                काँग्रेस यादगिरी
शरणप्रकाश पाटील             काँग्रेस सेडम
अलमप्रभू पाटील           काँग्रेस गुलबर्गा दक्षिण
सिद्धू पाटील                   भाजप हुमनाबाद
शिवराज पाटील                   भाजप रायचूर
दोड्डण्णगौडा पाटील              भाजप कुष्टगी
एच. के.पाटील                       काँग्रेस गदग
जी. एस. पाटील                       काँग्रेस रोण
सी. सी. पाटील                      भाजप नरगुंद
एम. आर. पाटील                 भाजप कुंदगोळ
व्ही. एस. पाटील                    काँग्रेस येलापूर

Back to top button