पुढारी ऑनलाईन ; सीबीआयने आज (शुक्रवार) बंगालमध्ये टीएमसी नेत्यांच्या ठिकाणांवर छापेमारी केली. ही छापेमारी २०२१ च्या निवडणुकीनंतर झालेल्या हिंसाचाराच्या प्रकरणी केली गेली. सीबीआयने बंगालच्या पूर्वी मेदिनीपूर जिल्ह्यातील काठी परिसरातील टीएमसी नेत्यांच्या ठिकाणांवर छापेमारी केली. २०२१ च्या विधानसभा निवडणुकीनंतर झालेल्या हिंसाचारात भाजपच्या एका कार्यकर्त्याचा मृत्यू झाला होता.
सीबीआयच्या अधिकाऱ्याच्या एका टीमने काठी ब्लॉक नंबर ३ च्या टीएमसी नेता देबब्रत पांडा यांच्या घरी छापा मारला. तसेच दुसऱ्या ब्लॉक मध्ये टीएमसी नेता नंददुलाल मैती यांच्या घरी ही कारवाई केली. सीबीआयच्या अधिकाऱ्याने सांगितले की, पांडा आणि नंददुलाल यांच्या मुलांची नावे ५२ अन्य आरोपींसोबत एफआयआर मध्ये दाखल करण्यात आली आहेत. हिंसेत भाजप कार्यकर्ता जन्मेजय दुलाईचा मृत्यू झाला होता. सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, आरोपींशी संबंधित ठिकाणांवर छापे टाकले जात आहेत. आरोपींची चौकशीही करण्यात येणार आहे. निवडणुकीनंतर हिंसेशी संबंधित ३० आरोपींना समन्स पाठवून त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. मात्र कोणीही हजर झाले नाहीत. त्यामुळे सीबीआयने ही छाप्याची कारवाई केली आहे.
मे २०२१ मध्ये पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचे निकाल आल्यानंतर पश्चिम बंगालमध्ये हिंसेची घटना घडली होती. खासकरून टीएमसी कार्यकर्त्यांनी अनेक ठिकाणी भाजपच्या कायकर्त्यांना लक्ष्य केले होते. हिंसेच्या भितीने अनेक भाजप कार्यकर्त्यांनी आपली घरेदेखील सोडली होती. हिंसेच्या भितीने राजकीय कार्यकर्त्यांनी घरे सोडण्याचे प्रकरण कलकत्ता हायकोर्टातही पोहोचले होते.
हेही वाचा :