रतन टाटा यांच्‍या जीवनातील अव्‍यक्‍त पैलूंचा ‘बॉयोग्राफी’तून होणार उलगडा | पुढारी

रतन टाटा यांच्‍या जीवनातील अव्‍यक्‍त पैलूंचा 'बॉयोग्राफी'तून होणार उलगडा

पुढारी ऑनलाईन डेस्क : देशातील ख्‍यातनाम उद्योगपती रतन टाटा यांच्या आजवरचा यशस्‍वी आणि समाजाभिमुख जीवन प्रवासाविषयी जाणून घेण्यासाठी देशासह जगभरात उत्सुकता आहे. त्यांची बायोग्राफी (चरित्र) प्रसिद्‍ध करण्‍यासाठी जगभरातील प्रकाशन संस्थांमध्ये स्पर्धा लागली होती. अखेर ब्रिटिश प्रकाशक हार्परकॉलिन्सने यांनी हा करार जिंकला आहे.

‘बॉयोग्राफी’तून उद्‍याेगपती रतन टाटा यांच्‍या जीवनातील अव्‍यक्‍त पैलूंचा होणार उलगडा

.हार्परकॉलिन्सने टाटा सन्सचे चेअरमन रतन टाटा यांची बायोग्राफी प्रकाशित करण्यासाठी भारताच्या इतिहासातील सर्वात मोठ्या नॉन-फिक्शन करारावर स्वाक्षरी केली आहे. हे पुस्तक नोव्हेंबर २०२२ मध्ये येईल. टाटांचा महत्त्वाकांक्षी नॅनो प्रकल्प, टाटा सन्सचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांच्याशी झालेला वाद आणि ब्रिटिश कंपनी कोरसचे अधिग्रहण आदी घटनांवर या पुस्‍तकाच्‍या माध्‍यमातून प्रकाशझाेत पडणार आहे.

कोण लिहणार रतन टाटांची बायोग्राफी?

१९३७ मध्ये जन्मलेले रतन नवल टाटा १९६१ मध्ये टाटा समूहात सामील झाले. १९९१ मध्ये ते टाटा सन्सचे अध्यक्ष झाले. त्यांच्या नेतृत्वाखाली टाटा समूहाने नेत्रदीपक प्रगती केली. टाटा समूहाने कोरियन कंपनी देवू, लंडनची कंपनी टेटली टी, जग्वार लँड रोव्हर आणि स्टील कंपनी कोरस ग्रुपचे अधिग्रहण केले.

द. ऑथोराइज्ड बायोग्राफीचे लेखक डॉ. थॉमस मॅथ्यू, माजी IAS अधिकारी आहेत.थॉमस मॅथ्यू यांना रतन टाटा यांचे चरित्र लिहिण्याची संधी मिळाली आहे. हे पुस्तक इंग्रजी आणि इतर प्रमुख भारतीय भाषांमध्ये प्रकाशित करणार आहे. हे यूएसमधील हार्परकॉलिन्स लीडरशिप आणि यूकेमधील विल्यम कॉलिन्स यांच्याद्वारे प्रकाशित केले जाणार आहे. या पुस्तकावर चित्रपट किंवा वेब सिरीज बनवण्याचे अधिकार लेखकाकडेच राहणार आहेत.

हार्परकॉलिन्सने प्रकाशन हक्क किती रुपयांत घेतले हे अजुनही उघड केलेले नाही. थॉमस मॅथ्यू यांना रतन टाटा यांचे चरित्र लिहिण्याची संधी मिळाली आहे. गेल्या काही वर्षांत त्यांना रतन टाटा यांची छायाचित्रे, खासगी कागदपत्रे आणि पत्रे उपलब्ध झाली आहेत. मॅथ्यू यांनी यापूर्वी ॲबोड अंडर द डोम आणि द विंग्ड वंडर्स ऑफ राष्ट्रपती भवन ही दोन पुस्तके लिहिली आहेत.

हेही वाचलं का? 

Back to top button