घाटकोपरमधील केमिकल कंपनीच्या टाकीत ३ कामगार गुदमरले, एकाचा मृत्यू, दोघे अत्यवस्थ | पुढारी

घाटकोपरमधील केमिकल कंपनीच्या टाकीत ३ कामगार गुदमरले, एकाचा मृत्यू, दोघे अत्यवस्थ

घाटकोपर; पुढारी वृत्तसेवा : घाटकोपरच्या एन एस एस रोडवर असलेल्या एक केमिकल कंपनीची टाकी साफ करण्यास गेलेले कामगार टाकीतच गुदमरले. यात एक कामगाराचा मृत्यू झाला असून दोन कामगार अत्यवस्थ आहे. त्यांना राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

एस्के डायस्टफस अँड ऑरगॅनिक केमिकल प्रा. लि. असे या कंपनीचे नाव आहे. आज सोमवारी सकाळी आठ वाजण्याच्या दरम्यान रुबिन डिंगनकर (३५), श्रावण सोनवणे (२५) आणि रामनिगोर सरोज (३५) हे तीन कामगार या कंपनीमधील केमिकलची टाकी साफ करण्यासाठी टाकीत उतरले होते. यावेळी या टाकीमध्ये केमिकलचा काही अंश राहिला असल्याने ते गुदरमले. याची माहिती कंपनीमधील इतर कामगारांनी अग्निशमन दलाला आणि पोलिसांना दिली. अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि त्यांनी या कामगारांना बाहेर काढून उपचारासाठी राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

यातील रामनिगोर सरोज या कामगाराचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला असून इतर दोन कामगार अत्यवस्थ आहे. घटनास्थळी घाटकोपर पोलीस दाखल झाले आहेत. या घटनेत दोष कुणाचा आहे? याबाबत सखोल चौकशी सूर असून पुढील कारवाई घाटकोपर पोलीस करणार आहेत.

हे ही वाचा :

पहा व्हिडिओ : काठीच्या आधारे पाण्यासाठीचा हा जीवघेणा संघर्ष

Back to top button