ऋतिक रोशनला मिळालं खास बर्थडे गिफ्ट, Vikram Vedha चा पहिला लूक | पुढारी

ऋतिक रोशनला मिळालं खास बर्थडे गिफ्ट, Vikram Vedha चा पहिला लूक

पुढारी ऑनलाईन

अभिनेता ऋतिक रोशनसाठी आजचा दिवस खूपचं खास आहे. आज त्याचा वाढदिवस आहे. या निमित्त त्याला एक खास गिफ्ट मिळालं आहे. ऋतिक रोशनच्या वाढदिवसाला त्याचा आगामी चित्रपट विक्रम वेधाचा फर्स्ट लुक रिलीज करण्यात आला आहे. त्याचे फॅन्सदेखील या चित्रटाची प्रतीक्षा करत होते.

T-Series ने hrithik roshan चा फर्स्ट लुक रिलीज करत त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा द‍िल्या आहेत. त्याचबरोबर, चित्रपटाची रिलीज डेटदेखील जाहीर करण्यात आली आहे. ३० सप्टेंबर २०२२ रोजी वर्ल्डवाईड थ‍िएटर्स हा चित्रपट रिलीज करण्यात येईल.

विजय सेतुपतीची आठवण करून देतो हा लुक

hrithik roshanचा लूक पाहिला तर तो दमदार अवतारात दिसतो. दाढी-मिशा, डोळ्यांवर ब्लॅक सनग्लासेस, कुर्ता, गळ्यात काळा धागा, विस्कटलेले केस, चेहरा आणि छातीवर रक्ताचे डाग, चित्रपटातील हा लुक त्याच्या भूमिकेची झलक दाखवतो. विक्रम वेधाच्या ओर‍िज‍िनल चित्रपटात विजय सेतुपतीने वेधाची भूमिका साकारली होती. hrithik roshan चा यह लुक विजय सेतुपतीची आठवण करून देतो.

दुबई-लखनऊमध्ये झाले चित्रपटाचे शूट‍िंग

विक्रम वेधामध्ये hrithik roshanआणि सैफ अली खान मुख्य भूमिकेत आहेत. hrithik roshan ने वेधा तर सैफने व‍िक्रमची भूमिका साकारलीय. राध‍िका आपटेदेखील मुख्य भूमिकेत आहे. विक्रम वेधाच्या काही भागाचे शूट‍िंग झाले आहे. रिपोर्ट्सनुसार, चित्रपटाच्या पहिल्या शेड्यूलचे शूट दुबईत झाले होते. त्यानंतर सैफ अली खानने लखनाैमध्ये १९ दिवसांचं शेड्यूल पूर्ण केलं.

आर माधवन-विजय सेतुपती ओर‍िज‍िनल कास्ट

विक्रम वेधा मूळचा तमिळ चिॆत्रपट आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन पुष्कर-गायत्री यांनी केलं आहे. आर माधवन – विजय सेतुपतीने मुख्य भूमिका साकारली होती. तमिळ विक्रम वेधाला प्रेक्षकांची पसंती होती. कमाईच्या बाबतीतही या चित्रपटाने सुपरहिट ठरला हाेता.या चित्रपटाला अनेक ॲवॉर्ड्सदेखील मिळाले होते. आता हिंदी रीमेक काय जादू करणार, हे चित्रपट पाहिल्यानंतरचं कळेल.

हेही वाचलं का? 

Back to top button