सांग तू आहेस का? फेम अभिनेत्रीचा मरून रंगाच्या नऊवारीत मराठमोळा साज
पुढारी ऑनलाईन : अभिनेता सिद्धार्थ चांदेकर यांचा छोट्या पडद्यावरील ‘सांग तू आहेस का?’ ही मालिका चाहत्याच्या घराघरात पोहोचली होती. या मालिकेत सिद्धार्थ चांदेकरसोबत अभिनेत्री शिवानी रांगोळे आणि सानिया चौधरी ( Saaniya Chaudhari) यांच्या मुख्य भूमिका होत्या. या मालिकेने मार्च २०२१ मध्ये १०० भाग पूर्ण केले होते. सध्या यातील सानिया चौधरीचा सोशल मीडियावर मराठमोळा लूक व्हायरल झाला आहे.
नुकतेच सानिया चौधरी ( Saaniya Chaudhari) हिने आपल्या इंन्स्टाग्रामवर अकाउंटवर मराठमोळा लूकमधील काही फोटो आणि एक व्हिडिओ शेअर केला आहे. या फोटोत मरून रंगाच्या नऊवारी साडीत ती खूपच सुंदर दिसत आहे. या साडीसोबत तिने मोत्यात्या आणि हिरव्या रंगाच्या बांगड्या परिधान केल्या आहेत. सानियाने साजेशीर दागिन्यासोबत केसांच्या अंबाडावर गजरा घातला आहे.
या मराठमोळ्या लूकमध्ये तिने गालावर हात ठेवत हटके पोझ दिल्या आहेत. नउवारीने तिच्या सौंदर्यात आणखीण भर पडली आहे. हा तिचा लूक चाहत्याच्या पसंतीस उतरला आहे.
हे फोटो सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांनी वेगवेगळ्या कॉमेंन्टस करून प्रतिक्रिया दिल्या आहेत. यात एकाने ‘सुंदर’, ‘क्यूट’, ‘ताई खूपच छान दिसता’ तर दुसऱ्या एकाने ‘फारच आवडला मराठमोळा साज’ असे लिहिले आहे.
छोट्या पडद्यावरील ‘सांग तू आहेस का?’ ही मालिकेने चाहत्यांचे मनोरंजन केले आहे. या मालिकेतील सानिया चौधरीची भूमिका चांगलीच गाजली. सानिया या मालिकेतून प्रकाश झोतात आली होती. याशिवाय सानिया सोशल मीडियावर सक्रिय असून नेहमी आपले फोटोज शेअर करून चाहत्याच्या संपर्कात राहत असते.
हेही वाचलंत का?
- Jitendra Awhad : “आरक्षणावरून ओबीसींमध्ये आग लागावी, हीच माझी इच्छा”
- Anushka Sharma : अनुष्का शर्माचे कमबॅक! झुलन गोस्वामीच्या बायोपिक ‘Chakda Express’चा फर्स्ट लूक रिलीज
- शिवानी रांगोळे-विराजस कुलकर्णी : सासू आहे प्रसिध्द अभिनेत्री
View this post on Instagram
View this post on Instagram
View this post on Instagram
View this post on Instagram
View this post on Instagram
View this post on Instagram