corona positive : इटलीहून अमृसरला आलेले १२५ प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह | पुढारी

corona positive : इटलीहून अमृसरला आलेले १२५ प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : देशात कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होऊ लागली आहे. त्यातच गुरुवारी (दि. ६ ) इटलीहून अमृतसरला आलेल्या विमानातील १२५ प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह ( corona positive ) आढळल्याने मोठी खळबळ उडाली आहे. विमानतळाचे संचालक वीके सेठ यांनी सांगितले की अमृतसरमध्ये पोहचल्यावर हे प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले.

इटलीच्या मिलान या शहरातून अमृतसरला आलेले चार्टर विमान (वाययू-६६१) मधील १७९ पैकी १२३ प्रवाशांना कोरोना ( corona positive ) झाल्याचे निष्पन्न झाले आहे. पंजाबचे आरोग्य अधिकारी या सर्व घटनेवर लक्ष ठेऊन आहेत. तसेच या १२५ प्रवाशांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.

कोरोनाच्या नव्या ओमायक्रॉनचा संसर्ग वाढत आहे. जगभरासह भारतात देखिल कोरोनाचे ( corona positive ) रुग्ण वाढण्याची गती पुन्हा वाढली आहे. मागील २४ तासामध्ये देशभरात नवे ९० हजार ९२८ रुग्ण आढळले आहेत. तसेच बुधवारी ५८ हजार ०९७ रुग्ण आढळले होते. कालच्या तुलनेत आजच्या रुग्णसंख्येत ५६.५ टक्क्यांची वाढ झाली आहे. तसेच मागील २४ तासात ३२५ लोकांचा देशभरता कोरोनाने मृत्यू झाला आहे. आता पर्यंत देशात कोरोनामुळे ४ लाख ८२ हजार ८७६ लोकांचा मृत्यू झाला आहे.

अनेक डॉक्टर्सना कोरोनाची लागण

आतापर्यंत मुंबई, दिल्ली, कोलकाता, पाटणा, चंडीगड, लखनौ, पटियाला आदी शहरात डॉक्टर्स आणि वैद्यकीय क्षेत्रातील लोक कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत. तिसऱ्या लाटेचा सर्वात जास्त फटका महाराष्ट्राला बसलेला आहे. राज्याची राजधानी मुंबईमध्ये डॉक्टर्स संक्रमित होत आहेत. गेल्या तीन दिवसांत वेगवेगळ्या रुग्णालयांतील 260 डॉक्टर्स कोरोनाबाधित झाले आहेत. गुरुवारी सायन रुग्णालयातील 30 निवासी डॉक्टर्सना कोरोनाची बाधा झाली होती. पंजाबमधील चंदीगड पीजीआय रुग्णालयातील परिस्थिती बिघडली असून गत दोन दिवसांत येथे 196 डॉक्टर्स आणि कर्मचारी बाधित झाले आहेत.

झारखंड राज्यात अशीच स्थिती असून रांचीच्या रिम्स रुग्णालयात बुधवारी विक्रमी प्रमाणात 179 कोरोनाबाधित डॉक्टर्स व वैद्यकीय कर्मचारी सापडले. याशिवाय रिम्समध्ये पंधराशे लोकांच्या चाचण्या घेण्यात आल्या होत्या, त्यातील 245 लोकांना कोरोना झाल्याचे दिसून आले होते. दिल्लीमध्ये अलीकडेच एम्स हॉस्पिटलमधील 50 डॉक्टरांना संक्रमण झाले होते. तर सफदरगंज रुग्णालयात 26 डॉक्टरांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता.

Back to top button