Joe Root : जो रूटने कसोटी क्रिकेटमध्ये रचला इतिहास! | पुढारी

Joe Root : जो रूटने कसोटी क्रिकेटमध्ये रचला इतिहास!

मेलबर्न; पुढारी ऑनलाईन : Ashes Series 2021 : इंग्लंड संघाचा कर्णधार जो रूटने (joe root) कसोटी क्रिकेटमध्ये इतिहास रचला आहे. रूटने रविवारी (दि. २६) ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या अॅशेस कसोटीच्या पहिल्या दिवशी अर्धशतक झळकावले. या बरोबरच तो एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक धावा करणारा कर्णधार बनला आहे. यापूर्वी हा विक्रम दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार ग्रॅमी स्मिथच्या नावावर होता.

जो रूटने (joe root) इंग्लंडच्या पहिल्या डावात ५० धावा केल्या. याचबरोबर २०२१ या एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक १६८० धावा करणारा तो पहिला कर्णधार बनला आहे. त्याने ग्रॅम स्मिथचा १३ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला. याआधी दक्षिण आफ्रिकेच्या या माजी कर्णधाराने एका कॅलेंडर वर्षात १५ कसोटीत १६५६ धावा केल्या होत्या. हा विक्रम त्याने २००८ मध्ये केला होता. आता रुटने १५ व्या कसोटीत १६८० धावा करून स्मिथला मागे सोडले आहे.

रूटकडे (joe root) आता एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक धावा करणारा खेळाडू बनण्याची संधी आहे. सध्या हा विक्रम पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद युसूफच्या नावावर आहे. त्याने एका वर्षात ११ कसोटी खेळताना १७८८ धावा केल्या. युसूफने २००६ मध्ये ही कामगिरी केली होती.

इंग्लिश कर्णधार जो रूट (joe root) लवकरच कसोटी क्रिकेटमध्ये १० हजार धावा पूर्ण करेल. त्याने आतापर्यंत १११ कसोटी, १५२ एकदिवसीय आणि ३२ टी-२० सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने कसोटीत ९४५३ धावा, एकदिवसीय सामन्यात ६१०९ धावा आणि T20 मध्ये ८९३ धावा केल्या आहेत. जो रूटने आतापर्यंत ३९ आंतरराष्ट्रीय शतके झळकावली आहेत. त्याने कसोटीत २३ आणि एकदिवसीय सामन्यात १६ वेळा शतकी खेळी साकारली आहे.

Back to top button