Boxing Day Match : बॉक्‍सिंग डे टेस्‍ट मॅच म्‍हणजे काय? भारताने केव्‍हा खेळला 'हा' सामना - पुढारी

Boxing Day Match : बॉक्‍सिंग डे टेस्‍ट मॅच म्‍हणजे काय? भारताने केव्‍हा खेळला 'हा' सामना

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : भारत आणि दक्षिण आफ्रिका कसोटी मालिकेस आज प्रारंभ हाेणार आहे. आजपासून सुरु होणार्‍या सामन्‍याला बॉक्‍सिंग डे टेस्‍ट मॅच ( Boxing Day Match ) म्‍हटलं जाते. बॉक्‍सिंग तर एक वेगळाचा क्रीडा प्रकार आहे; मग क्रिकेट सामन्‍याला ‘बॉक्‍सिंग डे क्रिकेट मॅच’ असे का म्‍हटलं जातं, असा प्रश्‍न अनेकांच्‍या मनात उपस्‍थित होतो. काही देशांमध्‍ये विशिष्‍ट दिवशी सुरु होणार्‍या कसोटी सामन्‍याला ‘बॉक्‍सिंग डे टेस्‍ट मॅच’ असे म्‍हटलं जाते.

२५ डिसेंबरला ख्रिसमस साजरा होतो. ख्रिसमसच्‍या एका दिवसानंतर सुरु होणार्‍या कसोटी सामन्‍याला बॉक्‍सिंग डे टेस्‍ट मॅच असे म्‍हटलं जाते. आता बॉक्‍सिंग डे मॅच ( Boxing Day Match )   हे नाव कसे पडले ? तर ख्रिसमस सणावेळी कंपन्‍या कर्मचार्‍यांना बॉक्‍समध्‍ये भेटवस्‍तू देते. यामुळेच ख्रिसमसच्‍या दुसर्‍या दिवशी होणार्‍या कसोटी सामन्‍याला बॉक्‍सिंग डे मॅच म्‍हटलं जावू लागलं.  ख्रिसमस निमित्त काही दिवस सुटी असते. त्‍यामुळे क्रिकेट सामना पाहण्‍यासाठी गर्दीही होते. त्‍यामुळे दक्षिण आफ्रिका, कॅनडा, ब्रिटन, ऑस्‍ट्रेलिया आणि न्‍यूझीलंड या देशांमध्‍ये हा सामना खेळवला जाताे.

यंदा दक्षिण आफ्रिका विरुद्‍ध भारत आणि ऑस्‍ट्रेलिया विरुद्‍ध इंग्‍लंड या दोन बॉक्‍सिंग डे टेस्‍ट हाेणार आहेत. बॉक्‍सिंग डे टेस्‍ट मॅचला १९५० मध्‍ये सुरुवात झाली. पहिली मॅचही ऑस्‍ट्रेलिया विरुद्‍ध इंग्‍लंड अशी झाली हाेती . भारताने आपला पहिली बॉक्‍सिंग डे टेस्‍ट मॅच १९८५मध्‍ये ऑस्‍ट्रेलिया विरुद्‍ध खेळली हाेती.

हेही वाचलं का? 

 

Back to top button