पर्यटन हंगामात प्रवाशांची अन्य वाहनांवर मदार | पुढारी

पर्यटन हंगामात प्रवाशांची अन्य वाहनांवर मदार

खासगी वाहनांकडे प्रवाशांचा ओढा

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : पर्यटनचा हंगाम असलेल्या ऐन हिवाळयात एसटी चाके बंद असल्याने तर, रेल्वेत जनरल तिकीटांची विक्री बंद असल्याने आरक्षित प्रवाशांनाच प्रवेश आहे.

परिणामी, या दोन्ही सार्वजनिक वाहतूक करताना प्रवाशांना अडचण जाणवू लागल्याने प्रवाशांना ओढा खाासगी वाहनांकडे वाढला आहे. देवदर्शन, पर्यटन, ग्रुप सहली, लगीनसराई व अन्य कामासाठी सध्या खासगी वाहनांवर अवलंबून राहवे लागत असल्याचे चित्र आहे.

कोरोनाच्या काळात नागरिकांना बाहेर पडणे मुश्किल झाले होते. त्यानंतर परिस्थिती आटोक्यात आल्यानंतर नियोजित केलेल्या सहलीसाठी पर्यटकांना खासगी वाहनांवर अवलंबून राहावे लागत आहे. एसटीची सेवा गेल्या दीड महिन्यापासून बंद आहे. परिणामी, या माध्यामातून प्रवाशांचे देवदर्शन व पर्यटन पूर्णपणे थांबले आहे.

करुणा धनंजय मुंडे यांच्याकडून नव्या पक्षाची घोषणा; परळीमध्ये निवडणूक लढवणार

सोशल मीडियावर पर्यटनांची चौकशी

फिरायला जायचे आहे, लग्नासाठी वाहने हवे आहे, अशा प्रकाराची विचारणा करुन सोशल मिडीयावर चौकशी करण्यात येते. त्यावर वेगवेळया खासगी ट्रव्हल्स आणि वाहन सेवा पुरवणा-या सेवा तत्परतेने उत्तरे देत आहेत.

सध्या एसटी सेवा विस्कळीत झाल्याने व रेल्वे प्रवाशांवर निर्बंध असल्याने अनेक नागरिक सोईचा प्रवास शोधत असल्याचे दिसून येत आहे.

राजापूर : निलंबित एसटी कर्मचारी राकेश बांते यांचे ह्‍दयविकाराने निधन

 

एसटी बंद, रेल्वे सुसाट

पुण्यासह पिंपरी-चिंचवड शहरातील एसटी सेवा बंद असल्याने गोरगरिब जनता रेल्वे प्रवासाकडे वळू लागली आहे. मात्र, यातही जनरल तिकीट बंद असल्याने आरक्षित डब्यांची प्रवासी संख्या वाढली आहे.

त्यामुळे आरक्षित डब्यात फुकटे प्रवासी वाढण्याची शक्यता आहे. एसटीचा बंद फटका प्रवाशांना बसत असल्याने पूर्वीप्रमाणे एसटीची जनरल तिकीट मिळण्याची मागणी करण्यात येवू लागली आहे.

भगर क्विंटलमागे दोन हजार, तर साबुदाणा 700 रुपयांनी महाग

“एसटी बंद असल्याने शहरालगत ग्रामीण भागात अन्य वाहतूक सेवा नाही. अन्य राज्यात रेल्वेने निर्बंध कमी केले आहेत. त्याचप्रमाणे महाराष्ट्रतही ते निर्बंध कमी करावेत. शाळा, महाविद्यालय तसेच, नोकरीसाठी नागरिकांना पुरेशा वाहतूक व्यवस्था नाही. एसटी बंद असल्याने पीएमपी बसवर अवलंबून राहावे लागते.”
-इक्बाल मुलाणी, रेल्वे प्रवासी संघटना अध्यक्ष, पिंपरी-चिंचवड

Back to top button