Nagpur gang rape : सामूहिक बलात्कार केल्‍याची तरुणीची खोटी तक्रार ; पोलिसांनी केला पर्दाफाश | पुढारी

Nagpur gang rape : सामूहिक बलात्कार केल्‍याची तरुणीची खोटी तक्रार ; पोलिसांनी केला पर्दाफाश

नागपूर : पुढारी वृत्तसेवा
संगीताच्या वर्गाला जात असताना दिवसाढवळ्या भररस्त्यात अडवून आपले अपहरण करण्यात आले. पुढे सामूहिक अत्याचार ( Nagpur gang rape ) करण्यात आला’, असा बनाव रचणाऱ्या युवतीचा नागपूर पोलिसांनी पर्दाफाश केला. खोटी तक्रार दिल्याच्या आरोपाखाली तिच्यावर गुन्हा दाखल केला जाईल, अशी माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.

अपहरण करुन सामूहिक बलात्‍कार झाल्‍याची दिली हाेती तक्रार

सामूहिक बलात्‍काराचा ( Nagpur gang rape ) बनाव रचणारी १९ वर्षीय तरुणी आहे. तिचे वडील एका हॉटेलमध्ये काम करतात. या तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार, ती रामदासपेठेतील दगडी पार्क परिसरात संगीताच्या वर्गासाठी येते. सोमवारीसुद्धा ती नेहमीप्रमाणे वर्गासाठी निघाली. ती रामदासपेठ परिसरातून पायी जात होती. यावेळी पांढऱ्या रंगाच्या ओम्नी व्हॅनमधून दोन अनोळखी तरुण उतरले. त्यांनी आपल्याला बळजबरीने व्हॅनमध्ये ओढले. व्हॅनमधून थेट क‌ळमना परिसरात नेले. तेथे एका निर्जनस्थळी आळीपाळीने अत्याचार केला. त्यानंतर त्यांनी आपल्याला तेथेच सोडले. आपण तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. धावतपळत कळमना पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मिनीमातानगर परिसरात आले. तेथे उपस्थित लोकांना आपबिती सांगितली. काही जणांनी आपल्या मित्रांना फोन करून बोलावून घेतले. यानंतर मित्रांनी आपल्याला कळमना पोलिस ठाण्यात नेले, असे युवतीने तक्रारीमध्‍ये म्‍हटलं होतं. या तक्रारीच्या आधारावर कळमना पोलिसांनी तिला सीताबर्डी पोलिस ठाण्यात आणले. या घटनेची माहिती मिळताच पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनीसुद्धा तातडीने सीताबर्डी पोलिस ठाणे गाठले.

Nagpur gang rape : शंभराहून अधिक सीसीटीव्हीचे फुटेज तपासले

युवतीची तक्रार ऐकून घेतल्यानंतर पोलिसांनी गंभीर दखल घेतली. सीताबर्डी ते रामदासपेठ या परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले. गुन्हेशाखा उपायुक्त तसेच अन्य कार्यालयांमधील सुमारे शंभराहून अधिक सीसीटीव्हीचे फुटेज तपासण्यात आले. सीताबर्डी येथे उतरल्यानंतर ही युवती ऑटोने मेयो रुग्णालयात गेली. त्यानंतर तेथून तिने दुसरा ऑटो केली. वती कळमन्यातील चिखली मार्केट येथे पोहोचली. येथे तिने आपल्यावरील अत्याचाराची खोटी कथा तेथे उपस्थित लोकांना सांगितली. या तपासात शहर पोलिस दलाचे सुमारे हजार पोलिस अधिकारी व कर्मचारी कार्यरत होते. ती खोटे बोलत असल्याचे सीसीटीव्ही फुटेजवरून लक्षात आले. पोलिसांनी तिची वैद्यकीय तपासणी करवून घेतली. त्यातही अत्याचाराचे कुठलेही पुरावे आढळले नाहीत. त्यानंतर पोलिसांनी तिची कसून चौकशी केली असता, आपण बनाव रचला असल्याचे तिने कबूल केले.

हेही वाचलं का? 

Back to top button