Bomb threat to train : दिल्ली-बंगळूर केके एक्सप्रेसमध्ये बॉम्ब असल्याची धमकी; ‘मॉकड्रिल’मुळे पाेलिसांसह बॉम्ब शोधक पथकाची तारांबळ | पुढारी

Bomb threat to train : दिल्ली-बंगळूर केके एक्सप्रेसमध्ये बॉम्ब असल्याची धमकी; 'मॉकड्रिल'मुळे पाेलिसांसह बॉम्ब शोधक पथकाची तारांबळ

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा
निनावी फोनवरुन दिल्ली-बंगळूर दरम्यान धावणारी केके एक्सप्रेसला ( Bomb threat to train ) बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्‍यात आली. या प्रकारानंतर पोलीस प्रशासन, आरपीएफ, बॉम्ब शोधक पथकाची मोठी तारांबळ उडाली. पोलीस प्रशासनाने आणि बॉम्ब शोधक पथकाने सोलापूर रेल्वे स्थानकात केके एक्सप्रेसची कसून तपासणी केली.

धमकी मिळाल्‍यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून पोलीस प्रशासनाने आणि बॉम्ब शोधक पथकाने सोलापूर रेल्वे स्थानकात केके एक्सप्रेसची ( Bomb threat to train ) कसून तपासणी केली. खास करून बी-1 या डब्याची संपूर्ण तपासणी करण्यात आली. यात एक बॅग संशयितरित्या आढळून आली. बॉम्ब शोधक पथकाने त्या संशयित बॅगची तांत्रिक उपकरणाने शहानिशा केली. पण त्यामध्ये काहीही संशयास्पद आढळले नाही. यामुळे पोलीस प्रशासन, आरपीएफ प्रशासन आणि बॉम्ब शोधक पथक यांची एकच तारांबळ उडाली. पोलीस उपअधीक्षक प्रवीण चौगुले यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, हा एक मॉकड्रिल होते.

Bomb threat to train : प्रवाशांमध्‍ये घबराट

दिल्लीहून बंगळुरूकडे जाणारी केके एक्सप्रेस 14 डिसेंबर रोजी मंगळवारी रात्री 11 च्या सुमारास सोलापूर रेल्वे स्थानकात पोहोचली. केके एक्सप्रेस सोलापूर रेल्वे स्थानकावर येण्यापूर्वी सोलापूर शहर पोलिसांची एक तुकडी प्लॅटफॉर्म क्रमांक चारवर तैनात होती. बॉम्ब शोधक पथक देखील दाखल झाले. पोलिसांचा मोठा फौजफाटा पाहून प्रवाशांत एक प्रकारे भीतीचे चित्र निर्माण झाले होते. दबक्या आवाजात एकमेकांना प्रश्न विचारत होते; पण कोणत्याही प्रवाशाला त्रास न होता, संपूर्ण एक्सप्रेसची तपासणी करण्यात आली.

बॉम्ब शोधक पथक प्रत्येक बॅगेची तपासणी करत बी-1 डब्यात पोहोचले. त्यावेळी एक बॅग संशयास्पदरित्या आढळली. बॉम्ब शोधक पथकाने ताबडतोब ती बॅग एक्सप्रेस मधून बाहेर काढली आणि त्याची तपासणी सुरू केली. डॉग स्क्वाडला देखील पाचारण करण्यात आले. बॅगेतील सर्व वस्तू हळूहळू बाहेर काढण्यात आल्या. पण त्यामध्ये कपड्याशिवाय काहीही आढळले नाही. सर्व तपासणी झाल्यानंतर केके एक्सप्रेसला सोलापूर रेल्वे स्थानकातून रवाना करण्यात आले.

निनावी कॉलचा ( Fake Phone Call ) गंभीरपणे विचार करत पोलिसांनी के के एक्सप्रेसची तपासणी सुरू केली. धमकी देणाऱ्याने सांगितले होते की, 1500 प्रवाशांना ठार केले जाणार आहे. यावर महाराष्ट्र पोलिसांनी केके एक्सप्रेसची प्रत्येक रेल्वे जंक्शनवर तपासणी सुरू केली. के के एक्सप्रेस महाराष्ट्रात दाखल झाल्या पासून प्रत्येक मोठ्या रेल्वे जंक्शनवर बॉम्ब शोधक पथक तत्पर ठेवून चेकिंग करण्यात आली.

हेही वाचलं का? 

 

 

 

 

 

 

 

Back to top button