राज ठाकरे उद्यापासून तीन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर | पुढारी

राज ठाकरे उद्यापासून तीन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर

पुणे : पुढारी वृत्तसेवा : शहरातील सर्व विभागातील पदाधिकारी यांची एकत्रित बैठक घेण्यासंदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे तीन दिवसांच्या दौऱ्यावर पुण्यात येणार आहेत, अशी माहिती शहराध्यक्ष वसंत मोरे, सरचिटणीस किशोर शिंदे, शहराध्यक्षा वनिता वागसकर यांनी दिली.

हा दौरा बुधवार दि. १५ ते शुक्रवार दि १७ डिसेंबर दरम्यान असणार आहे. त्यामध्ये बुधवार दि १५ डिसेंबर रोजी शिवाजीनगर, कोथरूड, खडकवासला आणि हडपसर मतदार संघाचा समावेश आहे. गुरुवार दि १६ डिसेंबर रोजी कसबा, पर्वती, कॅन्टोन्मेंट आणि वडगावशेरी या मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. या बैठकीला मनसेचे शहर पदाधिकारी उपस्थित राहणार नाहीत. केवळ राज ठाकरे हे पदाधिकाऱ्यांशी बोलणार आहेत. त्याचबरोबर शुक्रवार दि १७ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता कोथरूड येथे राज ठाकरे सर्व आजी माजी नगरसेवक आणि पदाधिकारी यांची बैठक घेणार असल्याचे मोरे यांनी सांगितले.

हेही वाचा

44 हजार घरांच्या गच्चीवर झाली 811 मेगावॅट वीजनिर्मिती

Virat vs Rohit : विराट कोहली-रोहित शर्मामध्ये पटेना, टीम इंडियातील ‘मतभेद’ विकोपाला!

मी अनिल देशमुखांना पैसे दिले नाहीत; चांदीवाल आयोगासमोर वाझेची साक्ष

भाजपला झटका! विधानसभेतील १२ आमदारांच्या निलंबनाला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

कोल्हापूर : मानसिंग बोंद्रेचा अंदाधुंद गोळीबार; शिक्षण संस्था आणि मालमत्तेच्या वादातून अंबाई टँक परिसरातील प्रकार

Back to top button