कुडाळ : गर्भवती असणाऱ्या अल्पवयीन विवाहितेची आत्महत्या; पतीस अटक | पुढारी

कुडाळ : गर्भवती असणाऱ्या अल्पवयीन विवाहितेची आत्महत्या; पतीस अटक

कुडाळ: पुढारी वृत्तसेवा

बिहार वरून पळून येऊन लग्न केलेला अल्पवयीन मुलीने दोन महिन्याची गरोदर असताना गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना मेढा तालुक्यातील जावळी येथे घडली. आत्महत्या केलेल्या विवाहितेच्या भावाने यासंदर्भात मेढा पोलीसांत तक्रार दाखल केली. त्यानुसार पती मोहम्मद आजाद जासिम (वय 22) याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला असून, पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, बिहारमधील गंगोली पोस्ट इथल्या विभुतीपूर येथे राहणारा मोहम्मद आजाद जासिम (वय 22) याने अल्पवयीन मुलीस आमिष दाखवत तिला पळवून आणले. तिच्याशी विवाह केला. दोघेही मेढा तालुक्यातील जावळी येथे भाड्याच्या खोलीत राहत होते. संशयित आरोपी मोहम्मद जासीम हा डिझेल मेकॅनिक काम करत होता.  त्याची पत्नी दोन महिन्यांची गरोदर होती.

दोघांमध्ये वारंवार वाद होत होते. त्या वादाला आणि जाचाला कंटाळून विवाहितेने घरातील लोखंडी अँगलला गळफास लावून 11 डिसेंबरच्या मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास आत्महत्या केली. याप्रकरणी विवाहितेच्या भावाने तिच्या पतीविरूद्ध मेढा पोलीसांत तक्रार दाखल केली. यानंतर पोलीसांनी त्याला तात्काळ ताब्यात घेतले.

या प्रकरणी उपविभागीय पोलिस अधिकारी डॉक्टर शीतल जानवे यांनी घटनास्थळी भेट देवून सविस्तर माहिती घेतली. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल माने करीत आहेत.

हेही वाचलं का? 

Back to top button