ब्रिटनमध्ये omicron variant मुळे हाहाकार; पंतप्रधानांनी दिला ‘हा’ इशारा | पुढारी

ब्रिटनमध्ये omicron variant मुळे हाहाकार; पंतप्रधानांनी दिला ‘हा’ इशारा

पुढारी ऑनलाईन डेस्क : ब्रिटनमध्ये omicron variant चा पहिला बळी गेल्यानंतर पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी देशाला इशारा दिला आहे (omicron variant इशारा ). सध्या देशात मोठ्या संख्येने रुग्ण असून देशात मोठी लाट येत आहे. तिला रोखणे गरजेचे आहे, असे सांगत ही लाट अनाकलनीयरित्या वाढत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. हा व्हेरियंट एकूण संसर्गाच्या ४० टक्के असल्याने सध्या लसीकरणावर भर दिला आहे.

जॉन्सन म्हणाले, ‘ओमायक्रॉन ची वेगाने पसरणारी लाट रोखण्यासाठी १० वर्षांवरील नागरिकांना डिसेंबर अखेर बुस्टर डोस देण्यावर भर दिला आहे. मागील कटू अनुभव आमच्या लक्षात आहे. संसर्गाचा ग्राफ वेगाने वाढतो. मागील २४ तासांत ओमायक्रॉनचे १२३९ रुग्ण आढळले आहेत. ब्रिटनमध्ये कोविड अलर्टचा स्तर तीनवरून चारवर केला गेला आहे.’

‍सध्या ब्रिटनमध्ये ओमायक्रॉनचे रुग्ण ३१३७ आहेत. एक दिवसापूर्वी १८९८ रुग्ण होते. रुग्णसंख्या वेगाने वाढत असून तेथे स्टेज 4 अलर्ट दिल्याचा अर्थ असा की, लाट वेगाने येत आहे. जर रुग्णसंख्या अशीच वाढत राहिली तर आरोग्य सेवेवर त्याचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे ब्रिटनमध्ये कडक निर्बंध लागू केले आहेत. सध्य जगातील ६३ देशांमध्ये ओमायक्रॉन व्हेरियंट पसरला आहे.

omicron variant : वैज्ञानिकांची ७५ हजार मृत्यूंची भीती

कोरोना व्हायरसच्या नव्या स्वरुपातील ओमायक्रॉनमुळे जागतिक आरोग्य संघटनेबरोबरच सर्वच देशांत चिंतेचे वातावरण आहे. अशात संशोधकांनी नव्या व्हेरियंटमुळे येणाऱ्या भीषण संकटाचा इशारा दिला आहे. लंडन स्कूल ऑफ हायजीन अँड ट्रॉपिकल मेडिसन आणि दक्षिण आफ्रिकेतील स्टेलनबोश विद्यापीठाच्या संशोधकांनी सांगितले आहे की ओमायक्रॉन ब्रिटनमध्ये हाहाकार उडवेल. जर ओमायक्रॉनविषयी कडक उपाययोजना केल्या नाहीत तर पुढील वर्षी २५ ते ७५ हजार लोकांचा मृत्यू होऊ शकतो. हा व्हेरियंट तिसऱ्या लाटेतील महामारी आणण्यास कारणीभूत ठरू शकतो.

चीनमध्ये डेल्टा एवाय ४ व्हेरियंटचे चार रुग्ण

चीनच्या झेजियांग प्रांता ५ ते १२ डिसेंबर दरम्यान कोविड १९ चे १३८ रुग्ण आढळले आहेत. हे सगळे रुग्ण कोरोना व्हायरसच्या डेल्टाचे एवाय ४ संक्रमित आहेत. त्यामुळे पूर्वेकडील भागात प्रवाशांवर निर्बंध घातले आहेत. १३८ रुग्णांमध्ये ११ निंग्बो, ७७ शाओक्सिंग, हांगझोऊमध्ये १७ रुग्ण आहेत.

omicron variant : दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्रपती संक्रमित

दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्रपती सिरिल रामफोसा यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यावर उपचार सुरू असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना लवकर बरे व्हा असा संदेश पाठविला आहे. सध्या आफिक्रेत ३७ हजार ८७५ नवे रुग्ण सापडले आहेत.

पाकिस्तानातही सापडला पहिला रुग्ण

पाकिस्तानची राष्ट्रीय आरोग्य संस्था एनआयएचने सोमवारी कराची शहरात ओमायक्रॉनचा रुग्ण सापडल्याचे जाहीर केले. एनआयएचने सांगितले की, आम्ही संशयित रुग्णांची तपासणी करत असून त्यांच्यावर नजर ठेवली जात आहे.

ओमायक्रॉनमुळे धोका का?

संशोधकांनी सांगितले की ओमायक्रॉनची लागण झालेल्यांना धोका आहे. कारण लसीकरणामुळे जी इम्युनिटी आहे ती सहा महिन्यांनतर कमकुवत होते. कोरोनामुळे सोशल मीडियावर अनेक अफवा पसरवल्या जात आहेत. फेसबुक आणि व्हॉट्स ॲपवर असा मजकूर प्रसिद्ध होत आहे. फेसबुकचे अधिकारी अँड्यू बोस्वर्थनी सांगितले की, लोक आपल्या व्यक्तिगत पातळीवरच मजकुराची शहानिशा करून ते स्वीकारतात. काय स्वीकारायचे आणि काय नाही हे ते ठरवत आहेत.

 

हेही वाचा : 

Back to top button