‘डायव्हर्जन अॅन्ड रूल’ हाच केंद्र सरकारचा फंडा : कन्हैया कुमार | पुढारी

‘डायव्हर्जन अॅन्ड रूल’ हाच केंद्र सरकारचा फंडा : कन्हैया कुमार

पुणे : पुढारी वृत्तसेवा : उद्याची हेडलाईन हे ठरवतात, मूळ प्रश्नाला बगल देतात. ब्रिटीशांनी डिव्हाईड आणि रुल हे धोरण वापरले. हे लोक सध्या डायव्हर्जन आणि रुल या धोरणाचा वापर करीत आहेत, असा टीका काँग्रेसचे नेते कन्हैया कुमार यांनी गुरुवारी केली. लोकशाहीच्या माध्यमातून निवडून आलेला एक तानाशाह सध्या गादीवर बसला आहे. निवडणुकीच्या माध्यमातून या तानाशाहीला हटविण्यासाठीच्या लढाईला कमकुवत करू नये, असे मत त्यांनी विरोधकांतर्फे पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण या प्रश्नावर व्यक्त केले.

कन्हैया कुमार यांनी पत्रकार संघात पत्रकारांशी सुमारे दीड तास विविध प्रश्नांवर संवाद साधला. संरक्षण दलाचे प्रमुख बिपीन रावत यांचे अपघाती निधन, महागाई सार्वजनिक क्षेत्रातील विक्रीला काढलेल्या कंपन्या, देशाची आर्थिक व सामाजिक स्थिती या बाबत सरकार अतिशय असंवेदनशील असल्याचा आरोप त्यांनी केला.

बिपीन रावत यांची त्यांच्या मूळ गावी घर बांधण्याची इच्छा राहिली अपुरी!

ते म्हणाले, मोदी सरकार म्हणणे हे देखील चुकीचे आहे. मोदी सरकार, ममता सरकार, हे ट्रेंड भाजपने तयार केलेले ट्रेंड आहेत. विरोधक अगदी बोटावर मोजण्याइतके असताना संसदेचे कामकाज करु दिले जात नाही, हा भाजपचा आरोप चुकीचा आहे. 300 पेक्षा जास्त खासदार यांचे असताना सभागृहाचे कामकाज चालू दिले जात नाही, हा आरोप चुकीचा आहे. बारा खासदारांचे निलंबन अत्यंत चुकीचे असून, देशात लोकशाही अस्तित्वात राहिलेली नाही. मोदींनी देशात तानाशाही चालवली आहे. केंद्र सरकार देशात जातीपाती आणि धर्मावरून राजकारण करून जनतेची दिशाभूल करीत आहे असा आरोपही त्यांनी केला.

रावत यांचा मृत्यू गांभीर्याने घ्यावा

देशाच्या संरक्षण दलाचे प्रमुख जनरल बिपिन रावत यांचा अपघाती मृत्यू दुर्दैवी आहे. देशातील अनेक अति महत्त्वाच्या व्यक्ती अशाच प्रकारच्या हेलीकॉप्टरने प्रवास करतात त्यामुळे प्रकरण केंद्र सरकारने गांभीर्याने घ्यावे, असे कन्हैय्या कुमार म्हणाले.

हेही वाचा

पुणे जिल्ह्यात आढळली 253 बालके अतिकुपोषित

पुणे : खराडीत बीआरटी स्टॉपला कारची धडक : दोन ठार; दोन जखमी

सिंहगड रस्त्यावरील पुलाचे काम दोन महिने लांबणार

बीअर शॉपीचालकांच्या तोंडाला ‘फेस’

Rajnath Singh : उड्डाणाच्या वीस मिनिटानंतर तुटला होता हेलिकॉप्टरचा संपर्क

पिंपरी : एक कोटी 10 लाख रुपये किमतीची उलटी

Back to top button