सिंहगड रस्त्यावरील पुलाचे काम दोन महिने लांबणार | पुढारी

सिंहगड रस्त्यावरील पुलाचे काम दोन महिने लांबणार

पुणे : हिरा सरवदे : मोठा गाजावाजा करून केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते भूमिपूजन केलेल्या सिंहगड रस्त्यावरील बहुचर्चित उड्डाणपुलाचे काम अद्याप सुरू झालेले नाही. त्यातच आता या रस्त्याला पर्याय ठरणारा मुठा कालव्यालगतचा रस्ता पूर्ण झाल्याशिवाय उड्डाणपुलाचे काम सुरू करता येणार नसल्याचे संकेत अधिकार्‍यांकडून दिले जात आहेत. त्यामुळे उड्डाणपुलाचे काम सुरू होण्यास किमान दोन महिने उशीर होणार असल्याचे स्पष्ट होत आहे.

नरवीर तानाजी मालुसरे रस्ता (सिंहगड रस्ता) परिसरातील वडगाव, धायरी, नर्‍हे, खडकवासला गावांचा झपाट्याने विकास होत आहे. या परिसरातून शहरात ये-जा करणार्‍या वाहनांची संख्या मोठी आहे. त्यातच सिंहगड रस्त्याला पर्यायी रस्ता नसल्याने या रस्त्यावर दिवसेंदिवस वाहतूक कोंडी वाढत झाली आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेने राजाराम पुलापासून फनटाईम थिएटरपर्यंत उड्डाणपूल बांधण्याचे नियोजन केले असून, त्याच्या 118 कोटी 37 लाख 931 रुपयांच्या निविदेला स्थायी समितीने मंजुरी दिली आहे.

बिपीन रावत यांची त्यांच्या मूळ गावी घर बांधण्याची इच्छा राहिली अपुरी!

गाजावाजा करून उद्घाटन

आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गडकरींच्या हस्ते व उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत गाजावाजा करून 24 सप्टेंबर रोजी उड्डाणपुलाचे भूमिपूजन करण्यात आले. त्यानंतर लगेच काम सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, भूमिपूजन कार्यक्रमातच गडकरींनी या ठिकाणी दुमजली उड्डाणपूल करण्यासाठी विचार करण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर प्रशासनाने दुहेरी उड्डाणपूल शक्य नसल्याचा व तो खर्चिक असल्याचा अहवाल तयार केला. यामुळे या रस्त्यावर नियोजनानुसार उड्डाणपूल होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या अनुषंगाने पिलर उभे राहणार्‍या ठिकाणी भूगर्भ परीक्षण करण्याची तयारी संबंधित ठेकेदाराने पूर्ण केली आहे. भूगर्भ परीक्षणाच्या चार मशिन आणून ठेवल्या आहेत. लोखंडी पत्र्याचे बॅरिकेड्स आणून ठेवले आहेत. वाहतूक पोलिसांनी परवानगीही दिली. त्यानंतर ठेकेदाराने परीक्षणासाठी लोखंडी बॅरिकेड्स उभे केले. मात्र, मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याने काही तासांतच बॅरिकेड्स काढून टाकण्यात आले. त्यानंतर अद्याप काम सुरू झालेले नाही.

आरोग्य विभागाच्या पेपरला मुंबईतूनच फुटले पाय

कामसाठी बॅरिकेड्स उभारल्यानंतर होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेऊन जोपर्यंत वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी ठोस उपाययोजना केली जात नाही, तोपर्यंत कामास परवानगी न देण्याचा पवित्रा पोलिसांनी घेतला आहे.
दरम्यान, पर्यायी कालव्यालगतच्या रस्त्याचे काम पूर्ण होण्यास आणखी दोन महिन्यांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे उड्डाणपुलाचे काम सुरू होण्यास काही अवधी लागणार असल्याचे दिसत आहे.

दिल्लीच्या रोहिणी कोर्टात स्फोट; स्कूलबॅगमधील लॅपटॉपसदृश वस्तूने घेतला पेट

सायकल ट्रॅक व पदपथ काढणार

वाहतूक कोंडी लक्षात घेऊन प्रशासनाकडून उपाययोजना करण्यात येत आहेत. त्या अंतर्गत राजारामपूल ते प्रकाश इनामदार चौकापर्यंतचे दोन्ही बाजूचे सायकल ट्रॅक व पदपथ काढण्यात येणार असल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले.

chopper crash : हवाई दल प्रमुखांची घटनास्‍थळी भेट, घटनास्थळी ब्लॅक बॉक्स सापडला

असा असेल प्रस्तावित उड्डाणपूल

स्वारगेटकडे जाणार्‍या वाहनांसाठी राजाराम पूल चौकात 495 मीटर लांबीचा आणि सिंहगडकडे जाणार्‍या वाहनांसाठी राजाराम पूल ते फनटाइम थिएटरपर्यंत दोन हजार 120 मीटर लांबीचा उड्डाणपूल उभारण्यात येणार आहे. दुहेरी वाहतुकीसाठी पुलाची रुंदी 16.3 मीटर आणि एकेरी वाहतुकीसाठी पुलाची रुंदी 8.150 मीटर असणार आहे. या उड्डाणपुलासाठी एकूण 72 पिलर उभारण्यात येणार आहेत. भविष्यात मेट्रो मार्गिकेचा विचार करून आवश्यक ती जागा ठेवण्यात येणार आहे.

१८ वर्षांवरील प्रेक्षकांनीचं पाहावा महेश मांजरेकर यांचा नवा चित्रपट

‘‘सिंहगड रस्त्यावरील नियोजित उड्डाणपुलाच्या संपूर्ण प्रकल्पात 1890 मीटर, 1260 मीटर आणि 250 मीटरचे तीन उड्डाणपूल उभारण्यात येणार आहेत. या उड्डाणपुलासाठी एकूण 72 पिलर उभारले जाणार आहेत. मात्र, या प्रकल्पाचे काम सुरू करण्यापूर्वी प्रत्येक खांबाच्या भूगर्भाचे (माती) परीक्षण करावे लागणार आहे. हे काम करण्यासाठी किमान दोन महिन्यांचा कालावधी लागणार आहे. या कामासाठी भूगर्भ परीक्षण मशिनरी, बॅरिकेड्स आले आहेत. मात्र, यासाठी वाहतूक पोलिसांची परवानगी मिळालेली नाही. त्यामुळे हे काम सुरू होऊ शकले नाही. ही परवानगी लवकर मिळेल, अशी आशा आहे.’’
                                                                                                 – अजय वायसे, उपअभियंता, प्रकल्प विभाग, महापालिका

Omicron variant in Maharashtra : मोठा दिलासा! महाराष्ट्रातील पहिला ओमायक्रॉन रुग्ण झाला बरा

‘‘महापालिकेने सुरुवातीला सर्व्हे करण्यासाठी वाहतूक पोलिस विभागाकडे परवानगी मागितली होती. त्यानुसार परवानगी देण्यात आली होती. मात्र, लोखंडी बॅरिकेड्स लावून रस्त्यावरील एक लेन बंद करून थेट भूगर्भ परीक्षणाचे काम हाती घेण्यात आले. यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. ही कोंडी सोडविण्यासाठी बॅरिकेड्स काढावे लागले. त्यानंतर महापालिकेने रस्त्यावरील लेन बंद करून काम सुरू करण्यासाठी परवानगी मागण्यात आली. आम्ही परवानगी नाकारलेली नाही. मात्र, काम सुरू केल्यानंतर होणारी वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी महापालिकेने ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे. या उपाययोजना केल्यानंतर काम सुरू करण्यास परवानगी देण्यास काहीच अडचण नाही.’’
                                                                                                                  – राहुल श्रीरामे, वाहतूक पोलिस उपायुक्त, पुणे

बीअर शॉपीचालकांच्या तोंडाला ‘फेस’

 

Back to top button