DC vs SRH : अबब…पॉवर प्लेमध्ये 125 धावा; हैदराबादने दिल्लीला धुतले | पुढारी

DC vs SRH : अबब...पॉवर प्लेमध्ये 125 धावा; हैदराबादने दिल्लीला धुतले

पुढारी ऑनलाईन डेस्क : दिल्लीविरूद्धच्या सामन्यात हैदराबादच्या फलंदजांनी तुफानी  फलंदाजी करत पॉवर प्लेमध्ये 125 धावा कुटल्या. यामध्ये अभिषेक शर्माने 400च्या स्ट्राईक रेटने 10 बॉलमध्ये 40 धावांची खेळी केली. यामध्ये त्याने 5 षटकार आणि 2 चौकार लगावले. तर हेडने 26 बॉलमध्ये 84 धावांची तुफानी खेळी केली. या दरम्याने त्याने 350 च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी केली. आपल्या खेळीत त्याने 6 षटकार आणि 12 चौकार लगावले. यामध्ये त्यांनी दिल्लीच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. (DC vs SRH)

हैदराबादने उभारली पॉवर प्लेमधील सर्वाधिक धावसंख्या

ट्रॅव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा यांनी शानदार फलंदाजी करत सहा षटकात बिनबाद 125 धावा केल्या. आयपीएलच्या इतिहासातील हा सर्वोच्च पॉवरप्ले स्कोअर आहे. या दरम्यान हेड-शर्मा जोडीने पहिल्या विकेटसाठी 125 धावांची  भागिदारी रचली. यापूर्वी, पॉवरप्लेमध्ये सर्वोच्च धावसंख्या केकेआरच्या नावावर होती. त्यांनी2017 मध्ये आरसीबीविरुद्ध बिनबाद105 धावा केल्या होत्या.

दिल्लीने टॉस जिंकला

दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंतने सनरायझर्स हैदराबादविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. हा सामना दिल्लीच्या अरून जेटली स्टेडियमवर खेळवण्यात येत आहे. सामन्यात दिल्लीने प्लेइंग-11 मध्ये दोन बदल केले आहेत. सुमित आणि इशांत शर्माच्या जागी ललित आणि एनरिक नोर्टजे यांचा संघात समावेश करण्यात आला आहे. या सामन्यासाठी सनरायझर्स हैदराबादने संघात कोणताही बदल केलेला नाही. (DC vs SRH)

दोन्ही संघांचे प्लेइंग-11

सनरायझर्स हैदराबाद : अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अब्दुल समद, नितीश रेड्डी, पॅट कमिन्स (कर्णधार), भुवनेश्वर कुमार, मयंक मार्कंडे, टी. नटराजन.

इम्पॅक्ट प्लेयर : उमरान मलिक, अनमोलप्रीत सिंग, आकाश महाराज सिंग, ग्लेन फिलिप्स, वॉशिंग्टन सुंदर.

दिल्ली कॅपिटल्स : डेव्हिड वॉर्नर, जॅक फ्रेझर मॅकगर्क, अभिषेक पोरेल, ऋषभ पंत (कर्णधार/ विकेटकीपर), ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, ललित यादव, कुलदीप यादव, ॲनरिक नॉर्टजे, खलील अहमद, मुकेश कुमार.

इम्पॅक्ट प्लेयर : पृथ्वी शॉ, शाई होप, प्रवीण दुबे, रशीख दार सलाम, सुमित कुमार.

हेही वाचा :

Back to top button