होर्डिंगच्या सुरक्षेची रेल्वेकडून पाहणी; शहर परिसरात 28 ठिकाणी होर्डिंग

होर्डिंगच्या सुरक्षेची रेल्वेकडून पाहणी; शहर परिसरात 28 ठिकाणी होर्डिंग

पुणे : पुढारी वृत्तसेवा : घाटकोपरला झालेल्या होर्डिंग दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासन अलर्ट झाले असून, पुणे विभागात असलेल्या रेल्वेच्या जागेतील होर्डिंगची सखोल सुरक्षा तपासणी करण्यात येत आहे. रेल्वेच्या पुणे विभागात 65, तर पुणे शहर परिसरात 28 ठिकाणी होर्डिंग लावण्यात आले आहेत. याद्वारे रेल्वेला सुमारे वर्षाला किमान 10 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळते. मात्र, रेल्वेच्या या उत्पन्नाच्या साधनामुळे सर्वसामान्यांवर मृत्यूची टांगती तलवार असल्याचे निदर्शनास आले आहे. मुंबईतील घाटकोपरला झालेल्या घटनेप्रमाणेच पुण्यातील शाहीर अमर शेख चौकातदेखील यापूर्वी घटना घडली होती. तेव्हा काही जणांना आपला जीव गमवावा लागला होता. त्यामुळे रेल्वेचे हे महाकाय होर्डिंग आगामी काळात आणखी किती जीव घेणार, असा प्रश्न पुणेकरांना पडला आहे.

घाटकोपर दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर आम्ही पुणे विभागातील होर्डिंगचे सुरक्षा ऑडिट सुरू केले आहे. बहुतांश ठिकाणच्या होर्डिंगचे ऑडिट झाले असून, भविष्यात दुर्दैवी घटना टाळण्यासाठी विभागातील सर्वच्या सर्व होर्डिंगचे ऑडिट करण्याचे आदेश संबंधित विभागाला देण्यात आले आहेत.

– इंदू दुबे, विभागीय रेल्वे व्यवस्थापक, मध्य रेल्वे, पुणे विभाग

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news