सिंधुदुर्ग: पत्नीच्या खूनप्रकरणी प्रकृती सुधारणा झाल्यानंतरच पेडणेकर यांना अटक | पुढारी

सिंधुदुर्ग: पत्नीच्या खूनप्रकरणी प्रकृती सुधारणा झाल्यानंतरच पेडणेकर यांना अटक

देवगड: पुढारी वृत्तसेवा : देवगड तालुक्यातील महाळुंगे धनगरवाडी येथे पत्नीचा चारित्र्याच्या संशयावरून खून करणारा तिचा पती सुनील सदानंद पेडणेकर (वय ५८) या संशयिताला उपचारासाठी ओरोस येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतरच संशयिताला अटक करून न्यायालयासमोर हजर करण्यात येईल, अशी माहिती विजयदुर्ग पोलिसांनी दिली.

शुक्रवारी सकाळी ११.१५ वा. च्या सुमारास संशयित सुनील पेडणेकर याने पत्नी सुप्रिया हिचा सुरीने वार करून घरातील स्वयंपाकघरातच निघृण खून केला होता. या घटनेदरम्यान आईला वाचविताना मुलगा रिद्धेश याने वडिलांना प्रतिकार केला होता. यावेळी संशयित सुनील याला दुखापत झाली होती. घटनेनंतर संशयित सुनील पेडणेकर याला विजयदुर्ग पोलिसांनी ताब्यात घेऊन उपचारासाठी देवगड ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, अधिक उपचारासाठी संशयिताला ओरोस जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले आहे. घटनेचा तपास विजयदुर्ग पोलीस करीत आहेत.

हेही वाचा 

 

Back to top button