दुर्दैवी! पेशवे तलावात बुडून तरुणाचा मृत्यू | पुढारी

दुर्दैवी! पेशवे तलावात बुडून तरुणाचा मृत्यू

कात्रज : परिसरातील नानासाहेब पेशवे तलावात मंगळवारी (दि.21) दुपारी साडेतीनच्या सुमारास एक युवक बुडाल्याची घटना घडली.
हा युवक तलावात पोहण्यासाठी उतरला असता तो बुडाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यास दिली. त्यानंतर घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी याबाबत अग्निशमन दलाला माहिती दिली. कात्रज अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी बोटीच्या साहाय्याने तलावात दोन ते तीन तास शोध या तरुणाचा शोध घेतला.

परंतु, त्यांचा मृतदेह आढळून आला नाही. रात्र झाल्याने सातनंतर शोधकार्य थांबविण्यात आले. कात्रज अग्निशमन दलाचे तांडेल वसंत भिलारे, फायरमन किरण पाटील, ड्रायव्हर बंडू गोगावले, विजय स्वामी, अक्षय देवकर, मयूर काटे, शुभम शिर्के, संकेत शेलार आदी या शोधकार्यात सहभागी झाले होते.

हेही वाचा

Back to top button