फेसबुकचा जादुई हात : Virtual Reality ला स्पर्श ही करता येणार | पुढारी

फेसबुकचा जादुई हात : Virtual Reality ला स्पर्श ही करता येणार

फेसबुकचा जादुई हात : Virtual Reality ला स्पर्श ही करता येणार

पुढारी ऑनलाईन : फेसबुक या कंपनीचं नाव मेटा असं करण्यात आलं आहे. मेटा या शब्दाचा अर्थ पलीकडे असा होतो. Virtual Reality and Augmented Realityचं नवं विश्व खुलं करण्यासाठी फेसबुक कार्यरत आहे. त्यासाठीचं कंपनीचं नाव बदलण्यात आलं. 

पण Virtual Reality किंवा Augmented Reality मध्ये दिसणाऱ्या जगातील वस्तूंना स्पर्श करता येईल का? स्पर्श केला तर त्या संवेदना जाणवतील का? आतापर्यंत तरी हे अशक्य वाटतं होतं, पण फेसबुकने हेही शक्य करून दाखवलं आहे. फेसबुक च्या मेटा कंपनीने हॅप्टिक ग्लोव्हजची निर्मिती केली आहे.

हे  ग्लोव्हज हातात घातल्यानंतर Virtual Reality मध्ये दिसणाऱ्या वस्तूंना स्पर्श करता येईल आणि त्या संवेदनाही जाणवतील. 

Facebook Haptic Gloves कसे काम करतील?

हॅप्टिक (Haptic) या शब्दाचा अर्थ स्पर्शाच्या माध्यमातून माहितीचं पोहोचवणे. तंत्रज्ञान क्षेत्रातील वेबसाईट द व्हर्जने ही बातमी दिलेली आहे. हे ग्लोव्हज (हातमोजे) Virtual Reality वर नियंत्रण ही ठेऊ शकतात. हे गोल्व्हज अजूनही प्रयोगशाळेत असले तरी भविष्यात Virtual Reality मध्ये यांचा फार मोठा वाटा असणार आहे. 

FB haptic gloves pudhari,newsस्पर्शाची संवेदना निर्माण करणं हे प्रत्यक्षात अत्यंत किचकट काम आहे, पण हे ग्लोव्हज हातात घातल्यानंतर ही अनुभूती घेता येणार आहे. 

फेसबुकने २०१४ला ऑनक्लसही कंपनी विकत घेतली होती. तेव्हापासून या ग्लोव्हजची निर्मिती सुरू आहे. याचं पहिलं प्रोटोटाईप २०१५ला बनलं होतं. 

Facebook Haptic Gloves अचुकता

हे ग्लोव्हज सर्वसामान्यांना उपलब्ध व्हावेत यासाठी फेसबुक प्रयत्नशील आहे. 

अर्थात याची अचुकता अजून वाढवण्यासाठी फेसबुक प्रयत्नशील आहे. उदा. सध्या या ग्लोव्हजच्या मदतीने तुम्ही Virtual Reality मधील कुत्र्याला स्पर्श करू शकता, आणि तो स्पर्श अनुभवता येऊ शकतो. पण या कुत्र्याच्या केसाचा Texture कसा आहे, हे मात्र कळणार नाही. यासाठी हे ग्लोव्हज अधिकाधिक अचूक व्हावे लागणार आहेत.

हेही वाचा

पाहा व्हिडिओ – अद्भूत पश्चिम घाट

Back to top button